हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मिळवली सव्वा कोटींची शिष्यवृत्ती, वाशिमच्या शेतकरीपुत्राची कमाल
Washim : जिद्द, चिकाटी आणि मेहनीच्या जोरावर वाशिममधील एका विद्यार्थ्याला केंद्र सरकारची तब्बल सव्वा कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
washim Scholarship : जिद्द, चिकाटी आणि मेहनीच्या जोरावर वाशिममधील एका विद्यार्थ्याला केंद्र सरकारची तब्बल सव्वा कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. हलाखीच्या परिस्थितीमध्ये समाधान कांबळे यानं शिक्षण घेत बापाचं नाव कमावलं. समाधान कांबळे याचे आई-वडिल समाधान अल्पभूधारक अशिक्षित शेतकरी आहेत. पोराच्या या यशामुळे त्यांच्या आनंद गगणात मावत नाही.
एखाद्या विद्यार्थ्याला फार झालं तर शिक्षणासाठी किती शिष्यवृत्ती मिळते? कुणाला 50 हजार, एक लाख शिष्यवृत्ती मिळते. पण वाशीमच्या एका अल्पभूधारक अशिक्षित शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच आई-वडिलांच्या मेहनतीच्या जोरावर समाधान यानं शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलीच. त्याच जोरावर समाधानला केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवली. एक कोटी 10 लाखा रुपयांची शिष्यवृत्ती समाधानला मिळाली. त्यामुळे त्याचा शिक्षणासह विदेशातील खर्च पूर्ण होणार आहे. समाधान कांबळेच्या जिद्दीची चर्चा परिसरात होत आहे.
वाशीमच्या पांघरी धनकुटे येथील उत्तम कांबळे यांना पाच एकर शेती आहे. उत्तम कांबळे अशिक्षित आहेत. पत्नी चौथी पास आहे. पती-पत्नीला शिक्षणाचा गधं नाही. पाच मुली आणि एक मुलगा असं कुटुंब आहे. मुलांना शिक्षणाची आवड असल्यामुळे हालाखच्या परिस्थितीत त्यांच शिक्षण कसं पूर्ण करायचं? असा प्रश्न कांबळे यांच्यासमोर होता. कांबळे यांनी आपली चार एकर शेती विकून शिक्षण पूर्ण केलं. दोन मुलींना नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं. समाधानचेही उच्च शिक्षण करण्यास त्यांनी जिवाचं रान केलं. आज समाधानला सव्वा कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. समाधान कांबळे याला केंद्र सरकारकडून एक कोटी 10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. त्याने दहावीपर्यंतचं शिक्षण खेड्यात पूर्ण केलं. त्यानंतर अकरावी आणि बारावीचं शिक्षण वाशिममध्ये घेतलं. तांत्रिक शिक्षण त्यांने पुणे येथे पूर्ण केलं. आता पुढील शिक्षणासाठी तो थेट The University of Melbourne, Australia ला जातोय. तिथं त्यानं Master of Civil engineering Business या कोर्ससाठी admission जाणार आहे..
आणि त्यासाठीच समाधानला भारत सरकारच्या National Overseas Scholership मंजूर करण्यात आली आहे. ही शिष्वृत्ती समाधानच्या शिक्षणाचा, प्रवासाचा, ऑस्ट्रेलियातील वास्तव्याचा, इत्यादी संपूर्ण दोन वर्षाचा खर्च उचलणार आहे. आई वडिलांना शिक्षणाचा खर्च न झेपावणारा होता, असं असताना शैक्षणिक कौशल्य पाहता गावातील काही लोकांकडून आर्थिक मदत मिळाली. मात्र पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी आई वडिलांना चार एकर शेती विकावी लागली. समाधानाने आई वडिलांच्या कष्टाचे चीज केलं आणि पुण्यातील शिक्षणाच्या जोरावर आता तो थेट ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी जाणार आहे. त्या सरकारकडून शिष्यवृत्ती शैक्षणिक खर्चासाठी एक कोटी दहा लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे.
आज ग्रामीण भागातील शिक्षणावर प्रश्न उपस्थित करत अनेक जण जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पाठ फिरवत शहराकडे धाव घेत इंग्रजी शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश करतात. मात्र तिथं आर्थिक ताण पडल्याने पाहिजे तसं शिक्षण न मिळाल्याने त्यांच्या अपेक्षा अपूर्ण राहतात. मात्र समाधान कांबळे याने गाव खेड्यातील शाळेत शिक्षण घेऊन आपले कौशल्य दाखवलं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI