JEE Main Result 2021: मार्च सेशनचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून नाशिकची गार्गी बक्षी आणि नवी मुंबईच्या अथर्व तांबटला 100 पर्सेंटाइल गुण
देशभरात झालेल्या JEE Main 2021 मार्च सेशन परीक्षेत 13 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.
मुंबई : देशपातळीवर आयआयटी, एनआयटी संस्थांमध्ये बीई/बीटेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या JEE Main 2021 मार्च सेशन परिक्षेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. यामध्ये देशभरातून 6,19,638 विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील 13 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल मार्क मिळवले आहे. यामध्ये महाराष्ट्रतून मूळ नाशिकच्या आणि शिकायला मुंबईत असलेल्या गार्गी बक्षीला आणि नवी मुंबईच्या अथर्व तांबट या विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण प्राप्त केले आहेत.
16 ते 18 मार्च दरम्यान देशातील विविध राज्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. सोबतच परीक्षा झाल्यानंतर फेब्रुवारीप्रमाणे या सुद्धा परिक्षेचा निकाल 10 दिवसात जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी सेशन परीक्षेत 6 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले होते तर या मार्च सेशन परीक्षेत 13 जणांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. यामध्ये तेलंगणा राज्यतील 3 विद्यार्थी, महाराष्ट्रतील 2, राजस्थान मधील 2, दिल्लीतील 2, बिहारमधील 1, तामिळनाडूचा 1 विद्यार्थी व पश्चिम बंगालचा 1 असे एकूण 13 विद्यार्थ्यांचा 100 पर्सेंटाइल गुण घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
कोरोना प्रादुर्भाव विचारात घेता यावर्षी विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी या परिक्षेसाठी मिळावी म्हणून यंदा JEE Main 2021 परीक्षा चार महिन्यांमध्ये म्हणजेच 4 सेशनमध्ये घेतली जातीये. यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात ही परीक्षा विद्यार्थ्यांना आपली बोर्ड परीक्षेचा वेळापत्रक पाहून व त्या प्रकारे नियोजन करून देता येणार आहे. विद्यार्थी ही परीक्षा 4 सेशनमध्ये कोणत्याही सेशनमध्ये अर्ज भरून देऊ शकतात. मात्र, 4 सेशनमध्ये ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण त्या परीक्षेत मिळालेले गुण अंतिम गुण म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI