IBPS Clerk Result 2021: आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक
IBPS Clerk Result 2021 : ibps.in याअधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे.
IBPS Clerk Prelims Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) यांनी आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षा 2021 चा निकाल (IBPS Clerk Prelims Result 2021)जाहीर केला आहे. ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहाता येणार आहे. परीक्षेला उपस्थित असणारे उमेदवार संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतात अथवा डाऊनलोड करु शकतात. 19 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवार ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात.
आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठड्यात लागेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आयबीपीएस परीक्षेचा निकाल 13 जानेवारी, गुरुवारी जाहीर करम्यात आला आहे. उमेदवारांना आणखी थोडावेळ वाट पाहावी लागणार आहे, कारण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे.
कधी होणार आयबीपीएस मुख्य परीक्षा (IBPS Clerk Main Exam kab)
आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षा पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेला (IBPS Clerk Main Exam) सामोरं जावे लागणार आहे. आयबीपीएस क्लर्क मुख्य परीक्षा जानेवारी अखेरीस अथवा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अंदाजे एप्रिल 2022 मध्ये जागा वाटप होऊ शकते.
कसा तपासाल निकाल ? IBPS Clerk Prelims Result 2021
स्टेप 1 : आयबीपीएसच्या अधिकृत ibps.in या संकेतस्थळावर जा
स्टेप 2: होम पेज वर, 'IBPS Clerk Prelims result' लिंक वर क्लिक करा
स्टेप 3: रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
स्टेप 4: प्रीलिम्स रिजल्ट स्क्रीन येईल, तिथे निकाल तपासा
स्टेप 5: रिजल्ट डाऊनलोड करा अन् प्रिंटआऊट काढा
हेही वाचा :
Infosys Recruitment 2022 : IT इंडस्ट्रीमध्ये नोकरी शोधताय? मग 'ही' संधी सोडू नका, इन्फोसिसमध्ये
SEBI Recruitment 2022 : सेबीमध्ये मोठी भरती; लगेचच अर्ज करा, संधी सोडू नका
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI