Knowledge : Math, Maths आणि Mathematics काय आहे फरक? वाचा सविस्तर
Math, Maths या दोन्ही शब्दांत नेमका काय फरक आहे? दोन्ही शब्दांचा अर्थ Mathematics असेल तर काही देशात Math आणि काही देशात Maths का म्हणले जाते?
Mathematics : गणित या विषयाचे नाव जरी काढले तरी अनेक मुले घाबरतात. त्यांना गणित हा विषय अगदी नकोसा वाटतो. याच्या उलट अशी काही मुले आहेत ज्यांना गणित हा विषय खूप आवडतो. या मुलांना गणित सोडवणे एक चॅलेंज वाटते. त्यामुळे अवघडातील अवघड गणित सोडवणे हे त्यांच्यासाठी अजिबातच अवघड नसते. गणित विषयाला जेव्हा इंग्रजीमध्ये लिहीले जाते, तेव्हा काही लोक Math , Maths किंवा काहीजण Mathematics लिहितात. हे तीनही शब्द एकाच विषयाशी निगडीत आहेत. मात्र याचे अर्थ वेगळे आहेत.
Math आणि Maths काय आहे नेमका अर्थ? (What Is The Meaning Of Math And Maths)
Math, Maths आणि Mathematics या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे. संख्या, आकार आणि पॅटर्न याचा अभ्यास म्हणजे Mathematics. वास्तविक पाहता विविध देशात या शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. अनेक देशात Math म्हणले जाते तर काही देशात Maths म्हणले जाते.
Math आणि Maths
या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की, अमेरिका आणि कॅनडा मध्ये Math म्हटले जाते, हा एक अमेरिकन इंग्लिश शब्द आहे. त्यामुळे अमेरिकन इंग्लिशमध्ये गणित विषयाला Math म्हणले जाते. तर ब्रिटन, आयरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अन्य ब्रिटिश देशांमध्ये इंग्रजी बोलणारे लोक Maths असे म्हणतात.
Mathematics चा अर्थ काय (Meaning Of Mathematics)
Mathematics हा मुळातच रोजच्या वापरातला शब्द आहे. ज्याचा अर्थ गणित असा होतो. हा विषय देशाच्या प्रत्येक भागात शिकवला जातो. भारतात अमेरिकन आणि ब्रिटिश इंग्लिश या दोन्ही भाषेचा वापर केला जातो. यामुळे भारतात Math आणि Maths दोन्ही शब्दांचा वापर केला जातो.
उदाहरणासहित समजून घ्या (Know With Example)
या तीनही शब्दात तसा फारसा फरक नाही. मात्र विविध ठिकाणी याचा Math आणि Maths असा वापर केला जातो. हा वापर कसा केला जातो उदाहरणसहित समजून घेऊ.
"I'm taking a math class." (United States)
"I'm taking maths." (United Kingdom)
"I'm studying mathematics." (Formal)
इतर महत्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI