एक्स्प्लोर

CUET 2022 Mock Test : कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेसाठी मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका प्रसिद्ध, येथे करा चेक

CUET 2022 Mock Test : कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा 2022 (CUET 2022) साठी मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

CUET 2022 Mock Test : कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा 2022 (CUET 2022) साठी मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या CUET परीक्षेला बसलेल्या इच्छुकांना या सराव प्रश्नपत्रिकांवरून CUET परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा प्रकार आणि नमुना याची कल्पना येऊ शकते. ते या मॉक टेस्टच्या साहाय्याने पेपरसह सराव करू शकतात. CBT चाचणी परीक्षा कशी दिली जाते हे देखील ते जाणून घेऊ शकतात. कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट ही एक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे ज्याद्वारे भारतातील अनेक केंद्रीय विद्यापीठांमध्ये (सेंट्रल युनिव्हर्सिटी यूजी ऍडमिशन्स) अंडरग्रेजुएट कोर्सेसमध्ये प्रवेश उपलब्ध असेल.

मॉक टेस्ट कशा द्यायच्या?

-cuet.samart.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
-CUET UG 2022 Mock Test Notification वर क्लिक करा.
-तेथे मॉक टेस्टची लिंक दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
-एक नवीन वेबपेज उघडेल.
-परीक्षेचे नाव, विषय आणि विचारलेले इतर अनेक तपशील भरावे लागतील.
-त्यानंतर तुम्ही मॉक टेस्ट सुरू करू शकता.

परीक्षा कधी होणार?
नॅशनल टेस्टिंग एजन्सी 554 शहरांमध्ये आणि परदेशातील 13 शहरांमध्ये कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET (UG) 2022 आयोजित करेल. 86 विद्यापीठांमध्ये 9.5 लाखांहून अधिक उमेदवारांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यापैकी 43 केंद्रीय विद्यापीठे, 13 राज्य विद्यापीठे आणि 12 डीम्ड आहेत. ही परीक्षा 15 जुलै, 16, 19, 20 आणि 4 ऑगस्ट, 5, 6, 7, 8 आणि 10 ऑगस्ट रोजी CBT पद्धतीने घेतली जाईल.

 कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच CUET 2022 (CUET 2022) ही देशातील दुसरी सर्वात मोठी परीक्षा बनली आहे, ज्याने पहिल्या वर्षीच देशातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विक्रम केला आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) चे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET (UG) 2022 भारतातील 554 शहरांमध्ये आणि परदेशातील 13 शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

86 विद्यापीठांमध्ये 9.5 लाखांहून अधिक उमेदवारांची प्रवेशासाठी नोंदणी

यूजीसी अध्यक्ष पुढे म्हणाले की 86 विद्यापीठांमध्ये 9.5 लाखांहून अधिक उमेदवारांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यापैकी 43 केंद्रीय विद्यापीठे आहेत, 13 राज्य विद्यापीठे आहेत आणि 12 डीम्ड आहेत. दुसरीकडे, कुमार म्हणाले की CUET 15 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येईल.

सर्व राज्यांतील उमेदवारांचे अर्ज 
या वेळी या परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही अर्ज केले आहेत. इतकेच नाही तर जवळपास प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून CUET साठी अर्ज आले आहेत. यूजीसीला अपेक्षा आहे की पुढील वर्षी आणखी अनेक केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे देखील या परीक्षेचे गुण ओळखतील.

डीयूसाठी सर्वाधिक अर्ज
यावेळी CUET परीक्षेद्वारे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठासाठी अर्ज भरले आहेत. यानंतर बीएचयू, अलाहाबाद विद्यापीठ या केंद्रीय विद्यापीठांना उमेदवारांनी प्राधान्य दिले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra HSC Result 2022 : 12 वी नंतर काय कराल? जाणून घ्या शिक्षणाच्या संधी

निकालानंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या, परीक्षेच्या काळात काही हितशत्रूंनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण...

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget