एक्स्प्लोर

Maharashtra HSC Result 2022 : 12 वी नंतर काय कराल? जाणून घ्या शिक्षणाच्या संधी

Maharashtra HSC Result 2022 : बारावीनंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी निर्माण होऊ शकतात. याविषयी काही करिअर ऑप्शनच्या टिप्स.

Maharashtra HSC Result 2022 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. बारावीचा निकाल तर लागला. परंतु, आता जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी मात्र, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. खरंतर, ही चिंता ज्यांनी मेरिट लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे त्यांनाही आहे आणि जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही आहे. याचसाठी बारावीनंतर पुढे कोणता करिअर ऑप्शन निवडावा यासाठी आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता. 

बारावीनंतर विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी :  

जर तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही पुढे B.Sc पदवीधर होऊ शकता. यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र यांसारखे विषय किंवा यापैकी एक विषय निवडून त्यात पदवीधर होऊ शकता. तसेच पुढील अभ्यासक्रमासाठी तुम्ही एखाद्या नामांकित युनिव्हर्सिटीतून M.Sc देखील करू शकता.    

बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये आपले भविष्य घडवू शकतात तसेच आयआयटी आणि जेईई परीक्षेची तयारी करू शकतात. जर तुम्हाला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे नसेल तर ते B.Sc, BA, ग्रॅज्युएशन आणि हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात.

बारावीनंतर कला शाखेतील करिअरच्या संधी : 

खरंतर कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बरेच करिअर ऑप्शन्स आहेत. जे तुमची आवडही जोपासण्यास मदत करतील तसेच तुम्हाला करिअरचा नवा मार्गही निर्माण करून देतील. पाहा कला शाखेतील करिअरच्या संधी. 

1. B.F.A (बॅचलर ऑफ फाईन आर्टस् )

2. B.J.M. (बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन )

3.  B.SW (बॅचलर ऑफ सोशल वर्क )

4. B.A (बॅचलर ऑफ आर्ट्स )

5. B.El.Ed (बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन )

6. इंटिग्रेटेड लॉ कोर्स : लॉ अर्थात कायद्याच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचा एकूण कालावधी हा पाच वर्षांचा असतो. यात विविध कायदा प्रकारच्या कायद्याच्या क्षेत्रांचा समावेश असतो. उदाहरणार्थ वनविषयक कायदे, आयपीसी [IPC], ग्राहक संरक्षण कायदा, व्यावसायिक कायदा इत्यादी.

7. B. P. ED (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन )

8. B.E.M (बॅचलर ऑफ इवेंट मॅनेजमेंट )

9. B.B.A. (बॅचलर ऑफ बिझनेस एॅडमिनिस्ट्रेशन ) : फक्त वाणिज्य शाखेतीलच नव्हे तर कला शाखेचे विद्यार्थी सुध्दा या क्षेत्रात करिअर घडवू शकतात.

10. B.H.M. (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट )

11. B.M.M. (बॅचलर इन मास मीडिया)

12. फॅशन डिझायनिंग

13. होम सायन्स

14. इंटिरियर डिजाइनिंग

15. ग्राफिक डिझाईन

16. ट्युरिझम कोर्स

तसेच स्वतःचा वेगळा व्यवसाय देखील करू शकतात.

बारावीनंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी : 

कॉर्पोरेट जगात काम करू इच्छिणारे विद्यार्थी सहसा त्यांच्या शिक्षणातील वाणिज्य क्षेत्राची निवड करतात आणि कॅट (CAT) , एक्सएट (XAT) आणि एमएटी (MAT) या परीक्षा देणे आवश्यक आहे. भारत आणि परदेशातील अनेक महाविद्यालये वाणिज्य क्षेत्रातील कोर्स उपलब्ध करुन देत आहेत. बारावी वाणिज्यानंतर डिप्लोमा अभ्यासक्रम, युजी अभ्यासक्रम (अंडर ग्रॅज्युएशन /Under Graduation) आणि पीजी अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएशन / Post Graduation) करण्याची शक्यता आहे.

बारावीत वाणिज्य विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्र, लेखाशास्त्र, गणित आणि व्यवसाय अभ्यास या मूलभूत संकल्पनांविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. या संकल्पनांचे चांगले ज्ञान हे आपल्याला वाणिज्य क्षेत्रात आपल्या पुढील शिक्षणास मदत करेल.

वाणिज्य क्षेत्रात12 वी पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे निवडण्यासारखे बरेच पर्याय आहेत. बीबीए आणि बी.कॉम हे विद्यार्थ्यांनी निवडलेले सर्वात सामान्य कोर्स आहेत. बीबीए आणि बी.कॉम व्यतिरिक्त इतरही कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही एक उत्तम करियर बनवू शकतात. जसे की तुम्ही

1. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (B.M.S)

2. बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज (B.B.S)

3. बॅचलर मास्टर ऑफ कॉमर्स (M.Com)

4. व्यवसाय प्रशासन मधील मास्टर (M.B.A)

5. बीएड (B.ed)

6. आयसीडब्ल्यूए बॅचलर इन लायब्ररी सायन्स

7. इंपोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा

8. एम.सी.ए. (MCA)

9. एल.एल.बी. (LLB)

यांसारखे करिअर ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. तसेच, तुम्हाला डिफेन्समध्ये जायचे असेल तर तुम्ही आर्मी, इंडियन नेव्ही, एअर फोर्समधील कोणतेही एक विभाग निवडून सरकारी नोकरी मिळवू शकता. यासाठी तुम्ही आधी एनडीएची तयारी करू शकता. तसेच तुम्हाला शिक्षणात किंवा नोकरीत फारसा रस नसेल तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील करू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Hostage Scare: रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच... तुम्ही पाहिलाय का?
रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच...
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Rohit Aary Story: ..मग पोलिसांनी दरवाजा तोडला, ओलीस ठेवलेल्या मुलीचे सांगितला A टू Z स्टोरी
Powai Hostage Crisis: रोहित आर्यचे पैसे दिपक केसरकरांनी का थकवले, ओलीस ठेवण्याची वेळ का आली?
Rohit Aary Pune House: रोहित आर्यचं पुण्यातील घर सध्या बंद, माझा खास रिपोर्ट
Mumbai Hostage Crisis: ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस, पवईत नाट्यमय थरार
Bachchu Kadu : '३० जून २०२६ च्या आत कर्जमुक्ती होणारच', बच्चू Kadu यांची ग्वाही; आंदोलन तूर्तास स्थगित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Hostage Scare: रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच... तुम्ही पाहिलाय का?
रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच...
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Rohit Arya Encounter: एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
फडणवीसांनी शिंदे सरकारची ती योजना बंद केल्याची चर्चा, तीच योजना ठरली रोहित आर्यच्या एन्काऊंटरचं कारण
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Embed widget