CBSE Term 2 Result 2022 Date : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा 10 वी, 12वीचा निकाल कधी? जाणून घ्या
CBSE 10th and12th Results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून निकाल लवकरच दहावी आणि बारावीचा निकालाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यावर्षी सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
CBSE Board 10th and 12th Results 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (CBSE) परीक्षेत बसलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. याशिवाय सीबीएसईकडून टर्म 2 (CBSE Term 2 Result 2022) परीक्षेचा निकालही लवकरच जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. CBSE बोर्डाकडून 15 जुलैपर्यंत 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर हा निकाल तुम्हाला बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर पाहता येईल.
CBSE बोर्डाकडून 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. तर, सीबीएसई बोर्डाची परीक्षा 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत पार पडली. या परीक्षेमध्ये 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची आणि 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.
निकाल कसा तपासाल?
स्टेप 1 : CBSE ने निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्याला प्रथम सीबीएसई बोर्डाच्या cbse.gov.in, cbresults.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
स्टेप 2 : यानंतर, दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : विद्यार्थी नोंदणी क्रमांक / रोल नंबर समाविष्ट करा.
स्टेप 4 : आता विद्यार्थ्याचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5 : त्यानंतर दहावी किंवा बारावीचा स्कोअरकार्ड डाउनलोड करा.
स्टेप 6 : विद्यार्थी पुढील गरजेसाठी निकालाची प्रिंट काढू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- JEE Main Admit Card 2022 : JEE Main प्रवेशपत्र जारी, 23 जूनपासून परीक्षा सुरू होणार, असे करा डाउनलोड
- RTMNU Exams : व्हॉट्सअॅपपवर आली प्रश्नपत्रिका ! विद्यापीठ परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार, पेपर आणि केंद्र रद्द
- Mission Zero Drop Out : शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी राज्य सरकारची विशेष मोहीम, शिक्षणमंत्र्यांची माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI