वसईच्या मॅकडॉनल्डमध्ये चोरट्यांचा डल्ला, रोकड हाती लागल्यावर मिठी मारुन आनंद साजरा
वसईच्या अग्रवाल सिटी येथे असलेल्या मॅकडॉनल्डमध्ये 11 ऑक्टोंबर 2021 रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास चोरी झाली होती.
वसई : वसईच्या मॅकडॉनल्डमध्येमध्ये झालेली चोरी अखेर वसईच्या माणिकपूर पोलिसांनी उघड केली आहे. मॅकडॉनल्डमध्ये पूर्वी काम करणाऱ्या युवकानेच ही चोरी केल्याचं समोर आलं आहे. माञ या चोरीचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती लागलं असून, त्यात सव्वा दोन लाखाची रोकड मिळाल्यानंतर चोरटयांनी मिठी मारुन आपला आनंद व्यक्त केल्याच दिसून आलं आहे.
वसईच्या अग्रवाल सिटी येथे असलेल्या मॅकडॉनल्डमध्ये 11 ऑक्टोंबर 2021 रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास चोरी झाली होती. पहिल्या मजल्यावरील तिजोरीतून चोरटयांनी सव्वा दोन लाख 21 हजाराची रोकड लंपास केली होती. चोरटयांनी दुकानाच्या मागून आत शिरुन, दुस-या मजल्यावर असलेल्या ड्रॉव्हर मधून ही रोकड लंपास केली होती. या चोरीत तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने याप्रकरणात आलोक सिंग आणि जितेंद्रकुमार सिंग या दोघांना बेडया ठोकल्या आहेत. यातील अलोक सिंग हा 2019 साली या मॅकडॉनल्डच्या दुकानात कर्मचारी म्हणून काम करत होता. त्यामुळेच त्याला कोणत्या डॉवरमध्ये रोखड ठेवली जाते. त्याची चावी कुठल्या डॉवरमध्ये असते ते माहित होते.
यातील तिसरा आरोपी अल्पवयीन आहे आणि तो फरार आहे. या तिघांनीही सर्व पैसे आपाल्या अय्याशीच्या सामानासाठी उडवले असल्याच समोर आलं आहे. त्यातील 51 हजार रुपये फक्त पोलिसांना रिकव्हर करता आले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती लागल्यावर त्यात चोरटयांना रोखड मिळाल्यानंतर यातील दोन चोर एकमेकांना मिठी मारुन जसं मोठं काम फत्ते केल्याच्या आविर्भावात आपला आनंद व्यक्त करत होते. माञ त्यांचा हा आनंद काही वेळेसाठीच राहिला.
संबंधित बातम्या :