एक्स्प्लोर

पालघरच्या डहाणूत Hit and Runचा थरार, भरधाव वेगात कार चालवत पादचाऱ्यांना उडवलं,  पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Hit and Run case in Palghar : पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये भरधाव गाडीनं पादचाऱ्यांना उडवल्याची दुर्घटना घडली आहे. गाडी चालवणारा पोलीस अधिकारी असल्याचं सांगण्यात येतंय.

पालघर : पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये भरधाव गाडीनं पादचाऱ्यांना उडवल्याची (Hit and Run case in Palghar) दुर्घटना घडली आहे. गाडी चालवणारा पोलीस अधिकारी असल्याचं सांगण्यात येतंय. चिंचणी ते डहाणू प्रवास करताना चालकानं बाजूनं चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. अपघातानंतर चालक फरार झाला अशी माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली.  ही गाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या नावावर आहे.  

डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक  सुहास खारमाटे यांच्या विरोधात  वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तारापूर ते डहाणू पोलीस ठाण्यापर्यंत भरधाव गाडी चालवून अपघात करून काहींना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या  गाडीने एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिल्यानंतर चक्क तीन चाकांवर कार जवळपास 18 किलोमीटर पर्यंत भरधाव चालवत डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात पार्क केली. यानंतर कार चालक भिंतीवरून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. ही कार डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या नावावर आहे. या कार मध्ये पोलीस हॅट कॅप सुद्धा आढळून आली आहे. 

ही अपघाताची घटना वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.  सुहास खरमाटे हे अजूनही फरार असल्याचे बोलले जात आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सुहास खारमाटे यांच्या विरोधात  वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे या गाडीमध्ये पोलिसांची टोपी असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर डहाणू पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचे अधिकारी नशेमध्ये गाडी चालवत असल्याचे बोलले जात असून तीन चाकांवरच गाडी चालवत असल्याचे DYSP यांनी सांगितले.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget