एक्स्प्लोर

Ulhasnagar : नेपाळी वॉचमनने वृद्धेला बांधत घर लुटलं! साडेसात लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार

एका नेपाळी वॉचमनने वृद्ध महिलेला बांधून साडेसात लाख रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठाणे : इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या नेपाळी वॉचमननेच एक घर लुटून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. या वॉचमनने त्याच्या तीन साथीदारांसह एका 76 वर्षाच्या वृद्ध महिलेला बांधून ठेवलं आणि सातेसात लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार तो झाला. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 20 मध्ये शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेनं उल्हासनगर शहरात खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 20 या भागात असलेल्या लिला व्हिला इमारतीत व्यावसायिक मनोजकुमार बजाज हे त्यांच्या आई, पत्नी आणि मुलासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी मनोज हे नेहमीप्रमाणे त्यांच्या व्यवसायासाठी निघून गेले, तर मनोज यांची पत्नी आणि मुलगा दुपारी एका नातेवाईकांकडे गेले. यावेळी मनोज यांची 76 वर्षीय आई लाजवंती बजाज या घरात एकट्याच होत्या. 

हीच संधी साधत त्यांच्या इमारतीचा नेपाळी वॉचमन दीपक हा पार्सल देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात आला. यानंतर त्याने लाजवंती यांना पाणी मागितलं. पाणी देण्यासाठी लाजवंती मागे वळताच त्याचे आणखी दोन साथीदार हे कटावणी, मोठे स्क्रू ड्रायव्हर घेऊन घरात घुसले. त्यांनी आधी लाजवंती यांचे हातपाय सेलो टेपने बांधून ठेवले. मात्र त्यांनी प्रतिकार केल्यानं या तिघांनी त्यांच्या तोंडात बोळा कोंबत त्यांचा आवाज दाबला. त्यानंतर घरातली दोन कपाटं फोडून त्यातून 4 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम, दागिने असा सरकारी मूल्यानुसार सुमारे साडेसात लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. 

ही जबरी चोरी करून इमारतीतून पळून जाताना चार जण सीसीटीव्हीत कैद झाले. त्यामुळं एक जण खाली रखवालीसाठी उभा केल्याचा संशय व्यक्त होतोय. या घटनेनंतर काही वेळाने लाजवंती यांची सून आणि नातू हे घरी आले असता त्यांना लाजवंती या सेलोटेपने गुंडाळलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यामुळं त्यांनी त्यांची सुटका केली असता, इमारतीचा वॉचमन दीपक यानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

याप्रकरणी मनोज बजाज यांच्या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून दीपकच्या शोधासाठी 8 टीम रवाना करण्यात आल्या आहेत. तर क्राईम ब्रँचकडूनही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget