(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMW चं स्पीड चेक करणं इतरांच्या जीवावर, वॅगन R ला धडक, पलटी होऊन फूटपाथवरील चिमुकल्यांचा मृत्यू
BMW Accident : दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन येथील लोधी रोड फ्लायओवरजवळ बीएमडब्ल्यू कार आणि वॅगन आर गाडीची धडक झाली.
BMW Accident : राजधानी नवी दिल्लीमध्ये एका 27 वर्षीय तरुण व्यवसायिक बीएमडब्ल्यू गाडीचा वेग चेक करत होता. त्यावेळी बीएमडब्ल्यूने वॅगन आरला गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे वॅगन आर गाडी फूटपाथवर पलटी झाली. यामध्ये दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. हा भीषण आपघात 10 जून रोजी दक्षिण दिल्लीमध्ये लोधी रोड फ्लायओवरजवळ पहाटे साडेचार वाजता झालाय. पोलिसांनी याप्रकरणी 27 वर्षीय व्यावसायिकाला अटक केली आहे.
दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन येथील लोधी रोड फ्लायओवरजवळ बीएमडब्ल्यू कार आणि वॅगन आर गाडीची धडक झाली. या घटनेत वॅगन आर गाडी फूटपाथवर झोपलेल्या लोकांवर आदळली. यामध्ये दोन चिमुकल्या बहिण-भावांचा मृत्यू झालाय. तर अन्य आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सहा वर्षीय रोशनी आणि 10 वर्षीय आमिर या दोघांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सीसीटिव्हीच्या आधारावर या घटनेतील आरोपी आणि बीएमडब्ल्यू कार चालकाला अटक केली आहे.
याप्रकरणी, वॅगनआर गाडीचा चालक यतिश किशर शर्मा याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वॅगनआर गाडी चालकासह अन्य चार जण जखमी झाले आहेत. लग्जरी गाडी चालवणाऱ्या साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, साहिल कुटुंबासोबत निर्माण विहार येथे राहतोय. त्याने नुकतीच पदवीचं शिक्षण पुर्ण केलेय. पोलिसांनी या प्रकरणातील लग्जरी बीएमडब्ल्यू गाडीही ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी आरोपी चालकास फ्लायओव्हरजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे ओळखलं. पोलिसांनी ऑबेरॉय हॉटेल, लोधी रोड, बारापुला रोड, लाजपत राय मार्ग या मार्गाकडे जाणाऱ्या सर्व 80 कॅमेऱ्यांचा तपास केला. त्या तपासाअंतर्गंत पोलिसांनी कारवाई करत चालकास अटक केली.
आणखी महत्वाच्या बातम्या :
Satara Crime : सातारमध्ये तिहेरी हत्याकांड, प्रेयसीचा गळा आवळून मुडदा पाडला, नंतर तिच्या दोन मुलांनाही विहिरीत ढकलले
Nashik Crime : भाऊच ठरला वैरी ! डोक्यात टिकाव टाकून भावाचा केला खून, नाशिकमधील धक्कादायक घटना