सातारा शहरातील नटराज मंदिराच्या आवारात गोळीबाराची घटना, दोन अज्ञातांकडून तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Satara Crime : सातारा शहराच्या गजबजलेल्या भागात भर दुपारी गोळीबाराची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. एका युवकावर गोळी घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली
सातारा : साताऱ्यात (Satara) आज भरदिवसा धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महामार्गालगत असलेल्या नटराज मंदिरातील आवारात एका युवकावर गोळी घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली आणि त्यानंतर आरोपी फरार झाले. गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सातारा शहराच्या गजबजलेल्या भागात भर दुपारी गोळीबाराची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन यादव असे संबधित खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खून झालेला युवक हा वाई तालूक्यातील गंगापुरी या ठिकाणी राहतो. त्याच्या डोक्याला दोन गोळ्या लागल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता त्यांना बंदुकीच्या गोळीची रिकामी पुंगळी सापडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी ती पुंगळी जप्त केली आहे.
जिल्हा पोलिस प्रमुखांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच संबधित मृत व्यक्तीचा संबध एका टोळीशी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपी नेमका कोण होते याबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळालेली नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. साताऱ्यात भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी अशी घटना कशी घडू शकते, आरोपींना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असे सवास आता घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत.
संबंधित बातम्या :
Aurangabad Crime News: कारागृहातून सुटताच पुन्हा चोरल्या मोटारसायकल; पोलिसांनी आता...