![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भाईजानच्या जीवावर का उठलाय लॉरेंन्स बिश्नोई? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय
Why Bishnoi Gang Targeting Salman Khan : बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi) सलमानला धमकी का देत आहे. बिश्नोई गँगने सलमान खानला लक्ष्य करण्यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.
![भाईजानच्या जीवावर का उठलाय लॉरेंन्स बिश्नोई? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय Salman Khan firing news Bishnoi gang suspected to have fired at Salman Khan s house galaxy apartment Why is Lawrence Bishnoi targets Salman khan mumbai crime marathi news भाईजानच्या जीवावर का उठलाय लॉरेंन्स बिश्नोई? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/14/2f82e9c75713a5ef9160d8f5b78fbbc01713065695849322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानच्या घराबाहेरील फायरिंगमागे बिश्नोई गँगचा (Bishnoi Gang) हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलमान खानच्या घराबाहेर रविवारी सकाळी गोळीबार झाला. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई टोळीने केला असावा, असा संशय मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून अनेक पथके तैनात केली आहेत.
सलमान खानच्या घरावर गोळीबार
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या तपासासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. यापूर्वी सलमानच्या वडीलांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती, त्यानंतर धमकीचा ई-मेलही आला होता. आता रविवारी 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराचा संबंधही बिश्नोई गँगशी असल्याचं बोललं जात आहे.
एटीएसकडूनही तपास सुरु
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र एटीएसनेही याप्रकणी तपास सुरु केला आहे. गोळीबारामागे कोणाचा हात आहे, याचा तपासही महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने सुरू केला आहे.
बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या मागे बिश्नोई गँग असल्याचा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने त्या दृष्टीने पुढील तपास सुरु केला आहे. बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi) सलमानला धमकी का देत आहे. बिश्नोई गँगने सलमान खानला लक्ष्य करण्यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.
नेमकं प्रकरण काय?
- 1998 साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता.
- सलमान खानने दोन वेळा काळवीट, चिंकारा हरणांची शिकार केल्याला आरोप आहे.
- लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात या प्राण्यांना देवासमान मानलं जातं.
- शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे.
- याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, चार राऊंड फायर झाल्याची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)