एक्स्प्लोर

मोठी बातमी : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, चार राऊंड फायर झाल्याची माहिती

Bishnoi Gang Firing Salman Khan House : अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी निवासनाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार (Firing) झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट (Galaxy Apartment) निवासनाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळाली आहे. पहाटेच्या सुमारास दोन जणांची दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. तपासाअंती अधिक माहिती समोर येईल, सध्या पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरु आहे.

अज्ञातांकडून चार राऊंड फायर

सलमान खान घराबाहेरील गोळीबारानंतर सीसीटीव्ही डीव्हीआर घेतला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पहाटे पाच वाजता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञानांकडून चार राउंड फायर केला. घटनास्थळी विविध पोलिसांची पथके या घटनेचा तपास करत आहेत. त्यात महत्त्वाचे असणारे सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि अज्ञातांचा तपास सुरू आहे.

याआधी चिठ्ठी आणि मेलद्वारे धमकी

यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना 2022 मध्ये एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये 'मुसेवाला जैसा कर देंगे', असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पिस्तूलचं लायसन्स देखील देण्यात आलं होतं. तसेच खाजगी सुरक्षारक्षकांमध्ये देखील वाढ करण्यात आली होती. नोव्हेंबर 2023 मध्येही धमकीचा ईमेल ही आला होता. त्यात पुन्हा आता गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भाईजानच्या घराबाहेरील गोळीबाराचा बिश्नोई गँगशी संबंध?

सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचं पथक दाखल झालं असून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी आणि तपास करण्यात येत आहे. आजच्या गोळीबाराचा बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाहा व्हिडीओ : दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर केला गोळीबार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Embed widget