एक्स्प्लोर

Pune Crime Rave Party: खडसेंच्या जावयाचा ठरवून गेम? कॉल करुन बोलावलं अन् अडकवलं; हॅकरचा सनसनाटी दावा

Pune Crime Rave Party: पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी सुरु असलेल्या फ्लॅटवर धाड टाकली होती. तेव्हा पाच पुरुष आणि दोन महिला पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. या पार्टीत ड्रग्जचे सेवन झाल्याचा दावा

Pune crime news: पुण्यातील खराडी परिसरातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या पार्टीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. खराडीतील 'स्टेबर्ड अझुर सूट' या हॉटेलमध्ये ही हाऊस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत कोकेन आणि गांजासदृश पदार्थ सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे अडचणीत आले होते. परंतु, आता या सगळ्याबाबत प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे आणि एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी खळबळजनक दावे केले आहेत. (Pune Rave Party)

ड्रग्ज पार्टी म्हणजे बालिशपणा वाटतो. एका फ्लॅटमध्ये जमल्यावर त्याला रेव्ह पार्टी म्हणता येणार नाही. प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचा अमली पदार्थ सेवन केला नाही, हे रक्त तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. खेवलकर यांच्यावर पूर्वनियोजित पद्धतीने दोन वेळा ट्रॅप रचले गेले होते. संपूर्ण प्रकरण बनावट आहे, असा दावा वकील विजयसिंह ठोंबरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

तर एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी रेव्ह पार्टी छापाप्रकरणात एक गंभीर आरोप केला आहे. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा या रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना कॉल करून त्याठिकाणी बोलवण्यात आले होते. यानंतर त्याठिकाणी छापेमारी करून त्यांना पकडण्यात आलं, असा दावा मनीष भंगाळे यांनी केला आहे. या प्रकरणात ज्या तांत्रिक बाबी माझ्यासमोर आल्या आहेत. जी माहिती मी गोळा केली आहे. त्यानुसार, याप्रकरणात खेवलकर यांना स्पष्टपणे ट्रॅप अडकवण्यात आले आहे. या प्रकरणाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता. त्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं आणि ते या जाळ्यात अडकले. त्यांचा या रेव्ह पार्टीशी कसलाही संबंध नाही. पार्टीतील लोकांनाही ते ओळखत नाहीत. यापूर्वी ते पार्टीतील लोकांच्या संपर्कात देखील नव्हते. एक-दोन दिवसांत पुणे पोलिसांना मी या सर्व गोष्टी सांगणार आहे. पुणे पोलिसांनी चौकशी केली आणि प्रांजल खेवलकर यांचे कॉल रेकॉर्डस आणि इतर गोष्टी तपासून पाहिल्यास त्यांच्याविरोधात रचण्यात आलेला कट स्पष्ट होईल, असा दावा मनीष भंगाळे यांनी केला.

आणखी वाचा

रेव्ह पार्टीत पती प्रांजल खेवलकरांना अटक; रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

एकनाथ खडसेंच्या जावयावरील कारवाईनंतर महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद; राऊतांनी पुन्हा एकदा सांड म्हणत गिरीश महाजनांना डिवचलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'

व्हिडीओ

Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
Embed widget