एक्स्प्लोर

Rohini Khadse On Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत पती प्रांजल खेवलकरांना अटक; रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Rohini Khadse On Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पत्नी रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Rohini Khadse On Pranjal Khewalkar: हनीट्रॅपच्या आरोपावर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये वादंग सुरू असताना आता पुण्यातील एका पार्टीवरून दुसरं वादळ निर्माण झालं. पुण्यातील एका पार्टीवर (Pune Rave Party) काल (27 जुलै) पोलिसांनी धाड टाकली. या  कारवाईत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. उच्चभ्रूची वस्ती असलेल्या पुण्यातील खराडीत एका हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती. पण त्यात खडसेंच्या जावयाचं नाव समोर आल्यानं मोठं राजकारण रंगलं आहे. याचदरम्यान आता रोहिणी खडसे यांनी सदर प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक केल्यानंतर रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

25 जुलैला देखील पार्टी, पोलिसांचा दावा-

पुणे पोलिसांनी छापा टाकून एकानाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पार्टी करताना 27 जुलै रोजी पहाटे अटक केली.या पार्टीत अमंली पदार्थ सापडल्याचा पुणे पोलीसांचा आरोप आहे. 26 जुलै रात्री पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटवर ही पार्टी सुरु झाली होती. मात्र पोलीसांच्या मते अशीच पार्टी 25 जुलैला देखील झाली होती असा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसांसाठी तो फ्लॅट बुक केला होता. त्यामुळे पुणे पोलीस शुक्रवारी 25 जुलैला झालेल्या पार्टीची देखील चौकशी करणार आहेत. त्यासाठी ज्या फ्लॅटमधे पार्टी झाली तिथले सी सी टी व्ही फुटेज देखील तपासणार आहेत.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

एकनाथ खडसे यांनी देखील भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे, त्यानुसार असं काही घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पुण्यात घटना घडली असे सांगितले जात आहे. मी हे मीडियातूनच पाहिले आहे. माझं अजून प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीत आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्याचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी आमची अपेक्षा आहे. जावई असो किंवा अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

रेव्ह पार्टी प्रकरणात कोर्टात काय काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टी सुरू असलेलं हॉटेल बुकींगही खडसेंच्या जावयाच्या नावावर; 25 ते 28 जुलै पर्यंत होत बुकिंग, पावतीही सापडली

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
Embed widget