एक्स्प्लोर

Pune Crime News : सोसायटीमधील पार्किंगवरून झालेला वाद विकोपाला; माजी सैनिकाचा गोळीबार, एक जण गंभीर

Pune Crime News : पुण्यातील येरवडा परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादातून माजी सैनिकाने एकावर बंदुकीतून गोळी झाडल्याची घटना घडली.

Pune Crime News पुणे: राज्यासह देशभरात आज दिवाळीचा उत्साह बघायला मिळतो आहे. दरम्यान, पुण्यातून एक खळबळजनक बातमी  समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादातून माजी सैनिकाने एकावर बंदुकीतून गोळी झाडल्याची घटना घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. अशोक नगर परिसरात एका सोसायटीमध्ये दुचाकीच्या पार्किंग वरून सोसायटीमधील दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये एका माजी सैनिकाने त्याच्याकडील बंदुकीतून गोळी झाडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकाला ताब्यात घेतले आहे. मात्र किरकोळ कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने चक्क गोळीबार झाल्याचे घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

दिवसाढवळ्या हातात बंदूक घेत तरुणांची दहशत   

दरम्यान, पुण्यातून अशीच एक दुसरी घटना उजेडात आली आहे. पुण्यात  दहशत माजवण्याचा प्रकार सुरू असल्याची ही घटना आहे. यात वडगाव ब्रिज ते वारजे ब्रिजपर्यंत हातात बंदूक घेऊन दहशत पसरवण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात हातात बंदूक घेऊन आणि गाडी चालकांना धमकावत तरुण गाडी चालवत होता. हातात बंदूक घेऊन रस्त्यावर नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार केला गेलाय.  या संपूर्ण प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  होताच  पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेत या तरुणांचा शोध सुरू आहे.  

पुण्यातील FC रोडवर चोरट्यांनी मारला डल्ला!

 राज्यभरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, यादरम्यान पुण्यात मात्र चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एफसी रोड, जे.एम.रोडवरील कपडे, आईस्क्रीम आणि शूजची दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील या प्रमुख रस्त्यांवरील एकूण 5 दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी 1.25 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकं घटनास्थळी उपस्थितीत झाले. फोडलेल्या 5 दुकानातून एकूण 1.25 लाख रुपये लंपास केले आहेत. 2 अट्टल चोरट्यांकडून ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकं करत आहे. दोन अट्टल चोरट्यांकडून ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.

हे ही वाचा 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 
अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 
धक्कादायक! चंद्रपुरात चक्क कॅन्सर हॉस्पिटलवरच सायबर हल्ला, डेटा लॉक; हॅकर्सकडून 75 लाखांची मागणी
धक्कादायक! चंद्रपुरात चक्क कॅन्सर हॉस्पिटलवरच सायबर हल्ला, डेटा लॉक; हॅकर्सकडून 75 लाखांची मागणी
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
Suryakumar Yadav: वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
Embed widget