विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईतून मोठी बातमी, कुलाब्यात 10 कोटी डॉलर्सचा परदेशी चलनाचा साठा सापडला
Maharashtra Assembly Elections 2024 : पुणे, पालघर, आणि उल्हासनगर पाठोपाठ कुलाब्यात 10 कोटी डॉलर्सचा परदेशी चलनाचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commssion) भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. याआधी पुणे (Pune), पालघर (Palghar) आणि उल्हासनगरमधून (Ulhasnagar) रोकड जप्त करण्यात आली आहे. या पाठोपाठ कुलाब्यातून (Colaba) एक मोठी बातमी समोर येत आहे. कुलाब्यातून तब्बल 10 कोटी किमतीचे डॉलर्स सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू संबंधित कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथे पोलिसांनी 5 कोटी रुपयांची रोकड एका कारमध्ये जप्त केली होती. तर पुणे शहरात सोन्याच्या दागिन्यांची वाहतूक करणारा टेम्पोही ताब्यात घेतला होता. पालघरमध्येही 5 कोटींची रोकड आढळून आली होती. त्यानंतर उल्हासनगरमध्ये एका कारमधून 17 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
10 कोटीचे डॉलर्स आढळल्याने खळबळ
आता कुलाब्यातून 10 कोटी किमतीचे डॉलर्स ताब्यात घेण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मरीन ड्राईव्ह येथील बालमोहन परिसरात नाकाबंदी दरम्यान ही रक्कम आढळली आहे. मात्र ही रक्कम मर्चटांईन बँकेची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे परदेशी चलन भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी घेऊन जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कस्टम अधिकारी यांच्याकडून देखील या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. विमानतळावरुन या संदर्भात परवानगी होती का? याची ही माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर पुरावे मिळाल्यानंतर ही रक्कम परत करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त
दरम्यान, निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य पोलीस विभागाने सुमारे 75 कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे 60 कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 11 कोटी रूपये जप्त केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आधी रेल्वे सुटली, पुन्हा हल्लेखोर समजून कार्यकर्त्यानी मारलं, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर आलं