(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Haridwar News : 'हरिद्वारमध्ये गंगेत आंघोळ केल्याने कर्करोग बरा होईल...' 5 वर्षाचा निष्पाप बालक ठरला अंधश्रद्धेला बळी!
Haridwar : हरिद्वार परिसरात बुधवारी दुपारी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे रक्ताच्या कर्करोगाशी झुंजत असलेल्या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
Haridwar : हरिद्वार परिसरात बुधवारी दुपारी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे रक्ताच्या कर्करोगाशी झुंजत असलेल्या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हरिद्वारमध्ये गंगेत बुडवल्यानंतर आजार बरा होईल, या अंधश्रद्धेतून या बालकाच्या नातेवाईक महिलेने त्याला काही वेळेसाठी पाण्यात बुडवले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.
पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.शहर पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, पती-पत्नी त्यांच्या मुलाला घेऊन आले होते. त्याच्यासोबत त्याचा एक नातेवाईकही होती. मुलगा ब्लड कॅन्सरने ग्रस्त असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. मुलाच्या पालकांनी सांगितले की, ते त्यांच्या मुलाला सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. त्या ठिकाणी डॉक्टरांनी मुलाच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.
मुलाला झाला होता ब्लड कॅन्सर
हर की पौरी येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जमावाने आरोपींना बेदम मारहाण केली. पाच वर्षांच्या निष्पाप बालकाचा बुडून मृत्यू होण्यामागे तंटासंबंधीचा मुद्दा असल्याची चर्चा आहे. स्थानिक पोलीस अधिकारी भावना कैंथोला यांनी सांगितले की, मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून कुटुंबीयांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. कुटुंबीयांनी सांगितले की मुलाला ब्लड कॅन्सर झाला होता आणि डॉक्टरांनीही त्याच्या जगण्याची आशा सोडली होती. मुलावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
People have been blinded by superstitions...🥹🥹
— जनरल नरभक्षी पैरोडी 🏹 (@GDnarbhakshi) January 24, 2024
In the hope of a miracle, a 7-year-old boy, suffering from blood cancer was dipped in the Ganga river at Harki Pauri in Haridwar, until his death, by his parents and aunt.
Pilgrims objected to the rituals and police rushed the… pic.twitter.com/aMu5SGma2h
वाटेत मृत्यू झाला
पूजा करत असलेल्या एका परिचित स्त्रीने त्याला सांगितले होते की गंगेत स्नान केल्याने मुलाचा आजार बरा होऊ शकतो. याच आशेने हे कुटुंब दिल्लीहून हरिद्वारला पोहोचले होते. जिथे त्याने मुलांना वारंवार गंगेत स्नान करायला लावले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वाटेतच मुलाचा मृत्यू झाला होता, तरीही गंगेत स्नान केल्याने मुलगा बरा होईल, अशी आशा होती.
टॅक्सी चालकाची चौकशी
शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी भावना कांथोला यांनी सांगितले की, मुलाचा वाटेतच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खून झाला की ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू हे स्पष्ट होईल, असे सांगितले. खुनासारखी घटना उघडकीस आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाला हरिद्वारला घेऊन आलेल्या टॅक्सी चालकाने सांगितले की, तो गंगेत स्नान करण्याच्या बहाण्याने मुलाला येथे घेऊन आला होता.