एक्स्प्लोर

Parbhani Ccrime: रात्रीची वेळ बघून तरुणीची छेड, आरडाओरडा केल्याने जमावाने तरुणास काढले फोडून, पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर घडला प्रकार

राज्यात बदलापूर,नाशिक, कोल्हापूर, चंद्रपुर, पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमधून महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर आल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

Parbhani Crime: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, महिलांच्या छेडछाडीच्या प्रकरणातही वाढ झाली आहे.  परभणीत पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाच्या शेजारीच तरुणाकडून मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. छेड काढणाऱ्याला जमावाने चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

राज्यात बदलापूर,नाशिक, कोल्हापूर, चंद्रपुर, पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमधून महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर आल्याने राज्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. दरम्यान, नागरिक सजग झाल्याचं दिसून येतंय.

नक्की झालं काय?

परभणीच्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरच एका तरुणाने युवतीला छेडले. रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, तरुणी जोरात ओरडल्याने आसपासची लोकं जमा झाली. मुलीने ओरडल्याने हा तरुण पळून जात होता. मात्र,जमा झालेल्या स्थानिकांनी त्याला शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पकडले आणि बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलवत त्यांच्याकडे या तरुणाला स्वाधिन केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून शहरातील छेडछाडीचे प्रकार वाढल्याने नागरिक संतापले आहेत.

तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

गावातीलच एका तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना  मिरज तालुक्यातील खंडेराजुरी गावात घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय.

बदनामीच्या भीतीने संपवली जीवनयात्रा

कुटुंबाच्या तंबीनंतर देखील 16  जुलैपासून पुन्हा तो तरुणीला त्रास देऊ लागला.  यामुळे तरुणी प्रचंड दडपणाखाली होती.  त्यामुळे 17 ऑगस्ट रोजी तरुणीने साहिल पुन्हा त्रास देऊ लागल्याने आणि तो असह्य झाल्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. बदनामीच्या भीतीने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.  मुलीच्या वडिलांनी साहिल बबन डफेदार याने मानसिक त्रास देऊन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिलीय.

नाशिकमध्ये संतापजनक प्रकार

बदलापूरच्या घटनेच्या (Badlapur School Case) निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलन होत असतानाच नाशिकमध्ये (Nashik Crime News) 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या उपेंद्रनगर (Upendranagar) परिसरात ही घटना घडली आहे. 

हेही वाचा:

गावातील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा, मिरज तालुक्यातील घटना

Nashik Crime News : शिक्षकी पेशाला काळीमा! नाशिकमध्ये खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षीय मुलीचा विनयभंग

रक्ताचे डाग, चप्पल अन् काडतुसे, रायगडमध्ये संशयित कार आढळल्याने खळबळ!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget