एक्स्प्लोर

गावातील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा, मिरज तालुक्यातील घटना

बदनामीच्या भीतीने तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याने  कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सांगली:  गावातीलच एका तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना  मिरज तालुक्यातील खंडेराजुरी गावात घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय.

साहिल बबन डफेदार (वय 21) असे संशयित तरुणाचे  नाव आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने  17 ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर तात्काळ तरुणीला  अत्यवस्थ अवस्थेत रूग्णालयात दाखल केले होते. मात्र रात्री उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. साहिल बबन डफेदार हा सुमारे चार-पाच महिन्यापासून तरुणीला छेडछाड करण्याच्या उद्देशाने फिरत होता.  मुलीने साहिल हा खंडेराजूरी गावात मिरज बसस्टँड परीसरात माझ्या पाठीमागे सारखा फिरत असल्याचे कुटुंबाने सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या  घरातील लोकांनी साहिलला ताकीद दिल्यानंतर  काही दिवस साहिलने तरुणीला त्रास दिला नाही.

बदनामीच्या भीतीने संपवली जीवनयात्रा

कुटुंबाच्या तंबीनंतर देखील 16  जुलैपासून पुन्हा तो तरुणीला त्रास देऊ लागला.  यामुळे तरुणी प्रचंड दडपणाखाली होती.  त्यामुळे 17 ऑगस्ट रोजी तरुणीने साहिल पुन्हा त्रास देऊ लागल्याने आणि तो असह्य झाल्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. बदनामीच्या भीतीने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.  मुलीच्या वडिलांनी साहिल बबन डफेदार याने मानसिक त्रास देऊन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिलीय.

कुटुंबावर शोककळा

मयत तरुणीला आरोपी  नाहक त्रास देत होता. सततच्या त्रासाला ती कंटाळली होती. तिने आई-वडिलांना छेडखानी होत असल्याबाबत माहिती दिली होती. तिच्या आई-वडिलांनी आरोपीची समजूतही घातली. तसेच त्याच्या आई-वडिलांची भेट घेऊन आपल्या मुलाला समज देण्याबाबत देखील कळवले. परंतु त्रास काही कमी होत नसल्याने ऋतुजाने जीवनयात्रा संपविली.  टोकाचे पाऊल उचलल्याने  कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा :

अमेरिकेत उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणीने अक्कल गहाण टाकली, ऑनलाईन पूजाअर्चेच्या नावाखाली भोंदूबाबाने लावला 18 लाखांचा चुना

                                                                    

                            

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget