एक्स्प्लोर

Nashik Crime News : शिक्षकी पेशाला काळीमा! नाशिकमध्ये खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षीय मुलीचा विनयभंग

Nashik Crime News : बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलन होत असतानाच नाशिकमध्ये 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : बदलापूरच्या घटनेच्या (Badlapur School Case) निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलन होत असतानाच नाशिकमध्ये (Nashik Crime News) 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या उपेंद्रनगर (Upendranagar) परिसरात ही घटना घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या सिडको (Cidco) परिसरात  10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग (Nashik Crime) झाला आहे. खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच (Teacher) विनयभंग केला आहे.  इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मुलगी क्लासरूममध्ये एकटी होती. तेव्हा संबंधित शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची माहिती मिळत आहे. उपेंद्रनगरमधील एका खासगी ट्युशन सेंटरमधून हा प्रकार उघडकीस आला आहे. 

पीडितेने आईला सांगितली आपबिती

या प्रकारानंतर पीडित मुलगी क्लासवरून घरी आली. मात्र, दुसऱ्या दिवशी तिने क्लासला जाण्यास नकार दिला. यानंतर पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला असता पीडित मुलीने आईला आपबिती सांगितली. घटनेची माहिती मिळतच पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. 

पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर संशयित शिक्षकाला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचं वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट

Nashik Crime News : नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget