Dawood Ibrahim : एनआयएची मोठी कारवाई! दाऊद इब्राहिमसह 4 साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल
Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गॅंगविरोधात एनआयएकडून चार्जशीट दाखल करण्यात आलंय.
![Dawood Ibrahim : एनआयएची मोठी कारवाई! दाऊद इब्राहिमसह 4 साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल nia files chargesheet against five accused including dawood ibrahim in case related d company Dawood Ibrahim : एनआयएची मोठी कारवाई! दाऊद इब्राहिमसह 4 साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/8971238e2266c67130f702ded88f532b1667657770876328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim ) आणि त्याच्या गॅंगविरोधात (D Gang) एनआयएकडून (NAI) चार्जशीट दाखल करण्यात आलंय. डी गॅंगने उकळलेल्या खंडणीचा वापर दहतवादासाठी करत असल्याचं समोर आल्यानंतर एनआयएनं ही कारवाई केली आहे. दाऊदकडून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी खंडणीच्या पैशाचा वापर केला जात आहे, असा एनआयएने आरोप केलाय.
एनआयकडून या पूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून दाऊदसह आणखी काही जणांना वॉंटेड घोषित करण्यात आलंय. श्रीमंत लोकांकडून खंडणी उकळून त्याचा वापर दहशतवादासाठी करण्यात येत होता. अटक करण्यात आलेल्या तिघांना हवालाकडून पैसे मिळत होते. हवालातून मिळालेल्या पैशाचा वापर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एनआयएला मिळाली. त्यावरून एनआयएने ही कारवाई केली आहे.
डी गॅंगशी संबंधित खंडणी प्रकरणी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही टेरर फंडिंग प्रकरणात अटकेत आहेत. एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात या दोघांसह दाऊद आणि छोटा शकीलचा समावेश आहे. सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा साडू आहे.
डी गॅंग आणि छोट्या शकीलच्या नावाने सलीम फ्रुट हा धमकी देऊन खंडणी गोळात करत असे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने त्याच्याविरोदात तक्रार दाखल केल्यानंतर सलीमला अटक करण्यात आली आहे. खंडणीसाठी सलीम संबंधित व्यवसायिकाला धमकी द्यायचा. तसेच तक्रारदाराची महागडी रेंज रोव्हर गाडी त्याने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती. आरोपींनी जबरदस्तीनं 65 लाखांची रोख रक्कमही ताब्यात घेतली होती. या प्रकरणात हवालामार्गे पैसे बाहेर पाठवण्यात आल्याचा आरोप एनआयएने त्यांच्या आरोपपत्रात केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कराचीमध्ये बसून भारतात दहशत पसरवण्याच्या तयारीत दाऊद अल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे. दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड माफियांच्या मदतीने भारतातील तरुणांना प्रभावित करून भारतातील ठराविक शहरांमध्ये दहशत पसरवण्याचा कट डी गँग रचत आहे. देशातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या विविध यंत्रणांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. या सर्व माहितीच्या आधारे एनआयएने दाऊदसह त्याच्या साथिदारांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
महत्वाच्या बातम्या
Dawood Ibrahim : दाऊद मोठा डाव खेळण्याच्या तयारीत, तब्बल 800 टन हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्लॅन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)