Dawood Ibrahim : दाऊद मोठा डाव खेळण्याच्या तयारीत, तब्बल 800 टन हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्लॅन
Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम समुद्र मार्गातून तब्बल 800 टन हेरॉईन भारतात आणण्याच्या तायरीत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या टोळीच्या माध्यामातून मुंबईत सक्रिय होत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यातच आता तो समुद्र मार्गातून तब्बल 800 टन हेरॉईन भारतात आणण्याच्या तायरीत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्याच्या या हालचालींमुळे तपास तंत्रणांची चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुजरात आणि मुंबईतून ड्रग्जची तस्करी करनाता अनेकांना अटक करण्यात आली आहे. असे असताना देखील काळ्या बाजारातून ड्रग्जची खरेदी आणि विक्री होत आहे. अलीकडेच डीआरआयने नवी मुंबईच्या नवाशिवा बंदरात एक मालवाहतूक रोखून फळांच्या पेट्यांमध्यून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचा भांडोफोड केलाय. डीआरआयने येथून 502 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याबरोबरच मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने 4856 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे ड्रग्ज भारतातच बनत होते. ते बनवणाऱ्याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणांच्या मते गेल्या काही दिवसांपासून इरान, बलुचिस्तान (पाकिस्तान) आणि अफगाणिस्तानातून भारतात आणले जात आहे. यासाठी वेगगेगळ्या बंधरांची मदत घेतली जात आहेत.
ड्रग्ज पुरवठादारांची ही कार्यपद्धती पाहता आता हे ड्रग्ज पेडलर आपल्या नेटवर्कचा वापर करून ड्रग्जची एवढी मोठी खेप आणू शकतात तर ते स्फोटके देखील आणू शकतील, अशी शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळेच तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) ची डी कंपनी आपल्या नेटवर्कचा वापर करून 800 टन हेरॉईन भारतात आणण्याची तयारी करत आहे. पाकिस्तानच्या बंदरातून समुद्रा मार्गे ते गुरजातला आणण्याच्या तयारीत आहे. गुजरातमधून अफ्रीकन देशात पोहचविले जाते. तेथून आपल्या नेटवर्कचा वापर करून जगभरातील विविध देशांमध्ये वितरीत केले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचे अनेक गुंड तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यामुळे आता आयएसआय हाजी सालेम नावाच्या व्यक्तीचा आणि त्याच्या नेटवर्कचा वापर करत आहे. हाजी सालेम हा असा मास्टरमाईंड आहे, ज्याच्याबाबत तपास यंत्रणांनाही पुरेशी माहिती नाही, मात्र त्याचा फोटो तपास यंत्रणांना मिळाला आहे.
अँटी नार्कोटिक सेलने आणि भारतीय नौदलाने अलीकडेच कोची जवळ समुद्रातून तब्बल 1200 कोटी रूपयांचे 200 किलो हेरॉईन जप्त केले होते. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील चार आरोपी इरानचे आहेत. याच प्रकरणात आहीज सालेम याचे नाव पुढे आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या