एक्स्प्लोर

Latur : NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन? 42 प्रश्न जुळल्याच्या तक्रारीनंतर क्लासेसची चौकशी सुरू

NEET Paper Leak Latur Connection : नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. मॉक टेस्टमधील 42 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याच्या तक्रारीनंतर खासगी क्लासेसची चौकशी सुरू झाली आहे.

NEET Paper Leak Latur Connection : NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात नाशिकनंतर आता लातूरचे नाव समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी एका खासगी क्लासेसची चौकशी सुरू केली आहे. मॉक टेस्टमध्ये दिलेले तब्बल 42 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत जशाच्या तसे आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीमुळे संबंधित क्लासेसचा पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला असून राज्यभरात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Latur Investigation NEET : पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा तपास

एका विद्यार्थिनीच्या पालकांनी 12 मे रोजी लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी तक्रार दिली. या तक्रारीत, परीक्षा होण्यापूर्वी खासगी क्लासेसने दिलेल्या मॉक टेस्टमधील 42 प्रश्न NEET (UG) 2026 च्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत आल्याचा दावा करण्यात आला.

Police Inquiry NEET Paper Leak : पोलीस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश दिले

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समरजीत साळवे यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

NEET Nashik Connection : नाशिकमधून पेपर सर्वप्रथम फुटल्याचा दावा

दरम्यान, NEET पेपरफुटीचे नाशिक कनेक्शनही समोर आले आहे. नाशिकमधील 30 वर्षीय शुभम खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने कथितरित्या 15 लाख रुपयांना पेपर विकल्याची माहिती समोर आली आहे. Central Bureau of Investigation (CBI) त्याची चौकशी करत असून पुढील तपासासाठी त्याला दिल्लीला नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

NEET UG 2026 Cancelled : 22 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम

NEET UG 2026 ही परीक्षा 3 मे 2026 रोजी झाली होती. देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी आणि महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पेपर 42 तास आधीच लीक झाल्याच्या आरोपांनंतर National Testing Agency (NTA) ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

NEET Re Exam Rules : पुन्हा नोंदणी किंवा अतिरिक्त शुल्काची गरज नाही

NTA ने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. बहुतांश विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा त्याच केंद्रांवर घेतली जाण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रक आणि प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत.

Political Reaction : राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

2024 मध्येही नीटचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळे आता विरोधकांनी केंद्रावर जोरदार तोंडसुख घेतलं आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्नं भ्रष्ट व्यवस्थेनं चिरडून टाकल्याचे ताशेरे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी ओढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा फुटल्याचं समोर आलं. नाशिकनंतर हरियाणा आणि देशाच्या इतर भागात हा गेस पेपर पोहोचला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget