एक्स्प्लोर

Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले

Khan Sir on NTA NEET Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणावर प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी NTA वर जोरदार टीका केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी नव्हे तर नेव्हर ट्रस्टेबल एजन्सी, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

Khan Sir on NTA NEET Paper Leak : नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असताना प्रसिद्ध शिक्षक खान सर (Khan Sir) यांनी एनटीएवर (National Testing Agency NTA) अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला असून ही केवळ प्रशासकीय चूक नसून गंभीर राष्ट्रीय समस्या असल्याचे त्यांनी म्हटलं. लहान मुलांचे दहा रुपयांचे डायपर कधी लीक होत नाही, यांचा नीटचा पेपर लीक होतो, एवढी भंगार व्यवस्था एनटीएची आहे अशा शब्दात खान सरांनी संताप व्यक्त केला. 

या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्यात येऊ नये, अन्यथा मुलांचे एमबीबीएस पूर्ण झाले तरी सीबीआयचा तपास सुरूच राहील, अशी टीका खान सर यांनी केली. या प्रकरणाचा तपास हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या देखरेखेखाली व्हावा अशी मागणी त्यांनी केली. 

Khan Sir Statement On NTA : नॅशनल टेस्टिंग एजन्सी नव्हे, नेव्हर ट्रस्टेबल एजन्सी 

खान सर यांनी उपरोधिक भाषेत National Testing Agency चं नाव बदलून "Never Trustable Agency" असं संबोधलं. परीक्षा घेण्यासाठी स्थापन केलेल्या संस्थेवरच विद्यार्थ्यांचा विश्वास उरलेला नाही, अशी तीव्र टीका त्यांनी केली. त्यांच्या मते, पेपर लीकची माहिती सरकारी यंत्रणांनी नव्हे तर विद्यार्थ्यांनीच प्रशासनापर्यंत पोहोचवली. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

NEET Paper Leak : लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ

खान सर म्हणाले की, NEET पेपर लीक हा लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनती, आत्मविश्वास आणि स्वप्नांवर घाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे तयारी केली, पालकांनी आर्थिक त्याग केला, परंतु भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्यांचे नुकसान झाले.

Supreme Court Observer : निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी

या प्रकरणाच्या चौकशीसाठी केवळ Central Bureau of Investigation (CBI) पुरेसे नाही, असे मत खान सर यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना निरीक्षक म्हणून नियुक्त करून ठराविक कालमर्यादेत दोषींना कठोर शिक्षा देण्याची त्यांनी मागणी केली.

CBI Comment : 'CBI नोकिया मोबाईलसारखी झाली आहे'

CBI च्या कामकाजावरही खान सर यांनी टीका केली. "CBI नोकिया मोबाईलसारखी आहे, एकेकाळी प्रभावी होती, पण आता तितकी सक्षम राहिलेली नाही, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

PM Modi Appeal : पंतप्रधानांनी वैयक्तिक लक्ष देण्याची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात वैयक्तिक हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही खान सर यांनी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने हा विषय सर्वोच्च प्राधान्याने हाताळला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

NEET UG 2026 Cancelled : 22 लाख विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता

NEET UG 2026 परीक्षा रद्द झाल्यानंतर सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मानसिक ताण, आर्थिक खर्च आणि भविष्यातील अनिश्चितता वाढली आहे.

ही बातमी वाचा: 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहाजींना चिट्टी पाठवली आहे... ' थेट मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहाजींना चिट्टी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
Operation Tiger UBT Shivsena: सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली
सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली
Operation Tiger UBT Shivsena: आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले, एकनाथ शिंदेंनी रात्री सगळ्यांना चकवून काय केलं?
आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले, एकनाथ शिंदेंनी रात्री सगळ्यांना चकवून काय केलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Operation Tiger: उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड
उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर भावासारखं प्रेम केलं, पण हे भोसxxx यांच्या अंगात गद्दारी भिनलीय; संजय राऊतांची फुटीर खासदारांवर आगपाखड
Operation Tiger UBT Shivsena: 'ऑपरेशन टायगर' फत्ते! ठाकरे गटाचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार; वेळही ठरली, ठाकरे गटात पुन्हा मोठा भूकंप
'ऑपरेशन टायगर' फत्ते! ठाकरे गटाचे 6 खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार; वेळही ठरली, ठाकरे गटात पुन्हा मोठा भूकंप
Operation Tiger UBT Shivsena: सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली
सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्व खासदारांना व्हीप धाडला, संसदीय दलाची बैठक बोलावली
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरची सर्वात मोठी अपडेट
एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले; ऑपरेशन टायगरची सर्वात मोठी अपडेट
Operation Tiger Live updates: ‘बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं..., त्यांच्यासोबत गद्दारी’; संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Live updates: ‘बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं..., त्यांच्यासोबत गद्दारी’; संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
Embed widget