Pune Crime News: आधी धमक्या नंतर वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलावलं अन्...; प्रियकरानं प्रेयसीच्या नवऱ्याला क्रूरपणे संपवलं; घटनेनं जेजुरी हादरलं
Pune Crime News: लग्नाचा वाद मिटवून टाकू म्हणून भेटायला बोलावलं आणि तिथेच कोयत्याने वार करून निर्घृण खून केला.

जेजुरी : प्रियकराकडून प्रेयसीच्या नवऱ्याचा वार करून निर्घृण खून केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली आहे. महिलेच्या पहिल्या प्रियकराने दुसऱ्याशी लग्न राग केल्याचा मनात धरून तिच्या पतीचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृणपणे (Pune Crime News) खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेत दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर, मूळ रा. राहू, ता. दौड) हा फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Pune Crime News)
Pune Crime News: तुम्ही दोघांनी लग्न का केले?
या घटनेबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी मृत दीपक जगताप याचा वाघापूर (ता. पुरंदर) येथील पायल अमोल कांबळे हिच्यासोबत एक महिन्यापूर्वी प्रेम विवाह झाला होता. मयत दीपक जगताप हा उरुळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करीत होता. नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरुळी कांचन येथे राहण्यास गेला होता. महिनाभर संसार सुरळीत चालू असताना पायलचा प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाइलवर फोन आणि व्हॉट्सअॅप कॉल करून मी पायलशी लग्न करणार होतो. तुम्ही दोघांनी लग्न का केले? असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. याबाबत मृत दीपकने आपल्या घरच्यांना माहिती दिली होती. मात्र, १३ डिसेंबर रोजी मृत दीपक पायलसह राजेवाडी येथे गेला होता. पायलला घरी सोडून सुशांत मापारी सतत कॉल करून पायलचा मोबाइल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा. तसेच लग्नाचा वाद मिटवून टाकू, असे सांगत असल्याने त्याला भेटून येतो, असे सांगून माळशिरसला गेला. (Pune Crime News)
माळशिरस गावच्या हद्दीत रामकाठी शिवारात त्याने दीपकला बोलावून घेतले. याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात मानेवर धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला व कोयता जागेवरच टाकून आरोपी पसार झाला. दीपक जगताप घरी न आल्याने आणि त्याचा मोबाइल बंद असल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता, माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला.
Pune Crime News: कोयत्याने वार केले अन् पळून गेला
माळशिरस गावच्या हद्दीतीस रामकाठी शिवारात दीपकला बोलावून घेतले. याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात मानेवर धारदार कोयत्याने वार करून खून केला व कोयता जागेवरच टाकून आरोपी पसार झाला. दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी घटनास्थळी आढळून आल्या. याबाबतची फिर्याद मयत दीपकचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.























