Nanded: नांदेड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाडसी कारवाई, 20 लाख रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त
Nanded: तुळजापूर, हिंगोली, नांदेड ,देगलूर, मुखेड या चार ठिकाणी तब्बल 20 लाख रुपये किमतीचा अवैध दारुसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलाय.
Nanded: धर्माबाद येथील पयोनियर डीसलरी कंपनीची दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने तुळजापूर कडे घेऊन जाताना उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी करत 20 लाख रुपये किमतीचा हा मद्य साठा जप्त केलाय. अपघात झाल्याची बतावणी करून हा मद्यसाठा करण्यात आला होता. या प्रकरणी आता पर्यंत तुळजापूर, हिंगोली, नांदेड ,देगलूर, मुखेड या चार ठिकाणी तब्बल 20 लाख रुपये किमतीचा अवैध दारुसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलाय.
आज रोजी झालेल्या कारवाईत धर्माबाद येथील पायोनियर डीसलरी या ठिकाणाहून उत्पादन शुल्क भरलेले 1 हजार 100 बॉक्स घेऊन अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी साठवणूक करण्यासाठी पाठविले होते. त्यांनंतर सदर वाहनाचा अपघात झाल्याची बतावणी करण्यात आली होती. त्या एक हजार 100 बॉक्स पैकी 415 बॉक्स तुळजापूर पोलिसांनी जप्त केले होते. तर आज उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही करत उर्वरित लाखों रुपये किमतीचा मद्य साठा जप्त केलाय.
नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या मद्य साठवणूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत तब्बल 20.50 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूबंदी गुन्ह्याखाली मुखेड तालुक्यातील एकलारा व देगलूर तालुक्यातील तमलूर येथे छापा मारून 20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास 1800833333 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 02462-287616 वर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले.
धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे उत्पादन शुल्क भरलेले 1 हजार 100 बॉक्स घेऊन निघालेल्या वाहनातील मद्यसाठा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतरत्र साठवून नंतर त्या वाहनाची तुळजापूर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. यातील 415 बॉक्स तुळजापूर पोलीसांनी तर 30 बॉक्स हट्टा पोलीसांनी जप्त केले आहेत. उर्वरीत 262 बॉक्स मद्यसाठा निरीक्षक देगलूर यांनी मुखेड व देगलूर तालुक्यात 2 ठिकाणी जप्त केला आहे. या गुन्ह्यात 3 आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांना तीन दिवसाची कोठडी मिळाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक ए. एम. पठाण हे करीत आहेत.
ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर विभागाच्या पथकाने निरीक्षक ए. एम. पठाण, दुय्यम निरीक्षक रामलिंग सुर्यवंशी, स. दु. नि. शिवाजी कोरनुळे, जवान उज्जल सदावर्ते, जवान नि वाहन चालक फाजिल खतिब यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. ही कारवाई दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे, हरि पाकलवाड, ए. जी. शिंदे, मो. रफी, बालाजी पवार, विकास नामवाड, परमेश्वर नांदुसेकर, आर. बी. फाळके, शिवदास नंदगावे, दिलीप जाधव यांनी मदत केलीय.
हे देखील वाचा-
- शिक्षण विभागाकडून रविवारी कार्यालय सुरु ठेवत डिसले गुरुजींना अध्ययन रजा मंजूर, परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा
- Kasai-Dodamarg Nagar Panchayat: सिंधुदुर्गातील कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत भाजप विजयी, पण श्रेयवादावरून दोन गटात वाद
- उत्तरेकडून आलेल्या धुळीच्या वादळाने महाराष्ट्रातही प्रदूषण, पालघरसह डहाणू आणि सफाळे परिसर प्रदूषणाच्या विळख्यात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha