एक्स्प्लोर

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा; मात्र माहेरच्यांचा मागणीनंतर दुसर्‍यांदा शवविच्छेदन, नेमकं कारण काय?

Nanded : नांदेडच्या तुळशीरामनगर येथे 32 वर्षीय विवाहिता प्रियंका अन्नपुरे हीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र अंगावर मारहाणीच्या खूना असल्याने आता पुन्हा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार आहेत.

नांदेड: शहरातील तुळशीरामनगर येथे 32 वर्षीय विवाहिता प्रियंका अन्नपुरे हीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शनिवार 25 जानेवारी रोजी ही घटना घडली. यात सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याने प्रियंका हिने गळफास घेउन आत्महत्या केली, अशी तक्रार प्रियांकाच्या वडिलांनी दिली. त्यावरून भाग्यनगर पोलीसांनी प्रियांकाचा नवरा, सासू , सासरे आणि नंदन अशा चार जणांवर गुन्हा (Nanded Crime News) दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती.

मात्र नातेवाईक येण्यापूर्वीच मृत प्रियंकाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. दरम्यान, मृत प्रियंकाच्या अंगावर मारहाणीच्या खूना (Crime News) आहेत, त्यामुळे पुन्हा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी प्रियंकाच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी आणि अधिष्ठातांशी चर्चा करून पुन्हा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कुठलीही शंका असू नये यासाठी कुटुंबियांच्या मागणीनुसार दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सध्या शासकीय रुग्णालयात दुसऱ्यांदा शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या प्रकरणाचे सत्य समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

 नेमकं प्रकरण काय?

पुढे आलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मालेगांव रोडवरच्या तुळशीराम नगर येथे 32 वर्षीय विवाहिता प्रियंका अन्नपुरे यांचा अलिकडे संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान, माहेरावरून पैसे आण अशी मागणी करत सासरची मंडळी तिचा सातत्याने छळ करत होते. तर सततच्या छळाला कटांळून प्रियंकाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेउन आत्महत्या केली, अशी तक्रार प्रियांकाच्या नातेवाईकांनी दिली. मात्र, हे प्रकरण बाहेर कुणाला माहिती पडू नये या भीतीमुळे नातेवाईक येण्यापूर्वीच मृत प्रियंकाचे शवविच्छेदन करण्यात आले होते.

मात्र  प्रियांकाच्या आई आणि भावाने याबाबत संशय व्यक्त करत याप्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर सासू, सासरे, नणंद आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिघांनाही अटक करण्यात आली होती. मात्र मृत प्रियंकाच्या अंगावर मारहाणीच्या खूना आहेत, त्यामुळे पुन्हा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी प्रियंकाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असता, आता दुसर्‍यांदा शवविच्छेदन करण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime News: काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Solapur Crime news: जग मला वाईट म्हणेल पण मी...; पत्नीसह मुलांना संपवलं नंतर टोकाचं पाऊल उचललं, 26 पानांच्या शेवटच्या नोटमध्ये मुख्यध्यापकांनं सगळं सांगितलं, म्हणाले....
जग मला वाईट म्हणेल पण मी...; पत्नीसह मुलांना संपवलं नंतर टोकाचं पाऊल उचललं, 26 पानांच्या शेवटच्या नोटमध्ये मुख्यध्यापकांनं सगळं सांगितलं, म्हणाले....
Pune Crime News: 'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
Abhishek Banerjee: अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
Bhiwandi News: जेसीबीचा धक्का लागला अन् 125 मिमीची गॅस पाइपलाइन फुटली! वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
जेसीबीचा धक्का लागला अन् 125 मिमीची गॅस पाइपलाइन फुटली! वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget