Nanded News : मानवी मुत्रापासून कार्बन पदार्थ, ऊर्जानिर्मितीसह इलेक्ट्रिक बॅटरीसाठी उपयोग; नांदेड विद्यापीठाच्या शोधाला अमेरिकेचे पेटंट
Nanded News : मानवी मुत्रापासून ऊर्जानिर्मिती केली जाऊ शकते याचा शोध नांदेड विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लावला असून या शोधाला आता अमेरिकेचे पेटंट मिळाले आहे.
नांदेड: मानवी मुत्रापासून ऊर्जानिर्मिती केली जाऊ शकते याचा शोध नांदेड विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लावला असून या शोधाला आता अमेरिकेचे पेटंट मिळाले आहे. माणसाच्या युरीनपासून कार्बन पदार्थ आणि ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते, याचा शोध नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रोफेसर आणि संशोधक विद्यार्थ्यांनी लावलाय. या प्रयोगासाठी वेगवेगळ्या 40 प्राण्यांच्या युरीनची तपासनी करण्यात आली. यामध्ये माणसाच्या युरिनमध्ये सर्वाधिक प्रमाणात युरिक ऍसिड आढळून आले. शुगर पेशंटमध्ये तर युरिक ऍसिडचे प्रमाण सर्वाधिक असते.
दरम्यान, युरिक ऍसिडमुळे त्यामध्ये फोटो कॅथेलिस्ट तयार करणे सहज शक्य होते. युरिनमध्ये स्टॅबीलायझिंग एजंट टाकला तर फोटोकॅथेलिस्ट तयार होतात. त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते. यापासून हायड्रोजन निर्मितीही केली जाऊ शकते. हायड्रोजनपासून ऊर्जा निर्मिती होते. ईलेक्ट्रिक बॅटरीमध्ये याचा वापर करण्याचा संशोधकांचा मानस आहे.
ऊर्जानिर्मितीसह इलेक्ट्रिक बॅटरीसाठी उपयोग
बॅटरी मध्ये हाय पॉवर नसते तर हाय एनर्जी असते. या प्रयोगातून निर्माण केलेल्या अर्जेत हाय पॉवर आणि हाय एनर्जी दोन्ही मिळणार आहे. त्यामुळे बॅटरी जास्त काळ टिकू शकते. मानवी शरीरातील कॅन्सर सेल शोधण्यासाठी याचा उपयोग होतो का यावरही संशोधन केले जात असल्याची माहिती प्राध्यापक राजाराम माने यांनी दिली आहे.
अमेरिकेकडून संशोधनाला पेटंट
दरम्यान, या संशोधनाचे पेटंट मिळावे यासाठी प्रोफेसर माने यांनी सौदी अरेबियातील प्रोफेसर मित्राकडून आर्थिक मदत मिळवली. अशातच अमेरिकेने या संशोधनाला आता पेटंट दिले आहे. भारत सरकारनेही या संशोधनाला सहकार्य करण्याची गरज असल्याची भावना प्राध्यापक राजाराम माने यांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Guillain Barre Syndrome in Pune: गुलेन बॅरी सिंड्रोममुळे राज्यातला पहिला मृत्यू, सोलापूरच्या तरुणाचा व्हिसेरा तपासणीला पाठवणार
-
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI