एक्स्प्लोर

Nagpur Crime News : आरपीएफची सतर्कता! छत्तीसगडमधून अपहृत विद्यार्थीनीची सुखरूप सुटका; गुंगीचे औषध देऊन केले होते अपहरण

Nagpur Crime News : नागपूर आरपीएफच्या सतर्कतेमुळे छत्तीसगढ (Chhattisgarh) मधुन अपहृत विद्यार्थीनीचा शोध घेत तिची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना (Nagpur Police) यश आले आहे.

Nagpur Crime नागपूर:  नागपूर आरपीएफच्या सतर्कतेमुळे छत्तीसगढ (Chhattisgarh) मधून अपहृत विद्यार्थीनीचा शोध घेत तिची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना (Nagpur Police) यश आले आहे. ही विद्यार्थिनी छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ती दहावीत शिकते. शुक्रवारी ती तिच्या आजोबांसोबत काही वस्तू खरेदीसाठी बाजारात गेली होती. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण (Nagpur Crime) करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणीने मोठ्या शिताफीने या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली आणि थेट नागपूर स्टेशन गाठले. त्यानंतर नागपूर आरपीएफ पोलिसांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित चाइल्ड लाईन नागपूर (Nagpur News) प्रतिनिधीच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या अपहृत विद्यार्थीनीला सुखरूप आपल्या घरी रवाना करण्यात पोलिसांना यश आले आहे.  

गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीचे अपहरण

घटनेतील अपहृत विद्यार्थीनी शुक्रवारी ती तिच्या आजोबांसोबत खरेदीसाठी बाजारात गेली होती. त्यानंतर आजोबा सलूनच्या दुकानात गेले, त्यावेळी ती जवळपास इतर वस्तू खरेदी करत होती. दरम्यान, तीन अज्ञात व्यक्तींनी तिला गुंगीचे औषध देत बळजबरीने गाडीत बसवले आणि आपल्यासोबत नेले. त्यानंतर या आज्ञातांची गाडी नरसिंगपूरजवळ आली असता, या तरुणीला शुद्ध आली. त्यावेळी तिने मोठ्या शिताफीने या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली आणि थेट नारसिंहपूर रेल्वे स्थानक गाठत समोर असलेल्या गाडीत बसून ती नागपूरला पोहोचली. त्यानंतर आजोबा सलूनच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी विद्यार्थीनीचा शोध घेतला असता ती कुठेच आढळून आली नाही. भयभीत झालेल्या आजोबांनी कुटुंबीयांना याची महिती दिली असता त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून अपहरणाची तक्रार दाखल केली. परिणामी, पोलिसांनी मुलीच्या मोबाईलचे लोकेशन चेक केलं, त्यावेळी ती नागपूरच्या दिशेने जात असल्याचे दिसले. त्यानंतर आरपीएफ रायपूर आणि बलरामपूर पोलीस स्टेशन छत्तीसगड यांच्याकडून नागपूर आरपीएफ यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर आरपीएफच्या वरिष्ठ सुरक्षा आयुक्तांना ही माहिती देण्यात आली. आरपीएफचे निरीक्षक आर. मीनाच्या मोबाईलवर विद्यार्थिनीचा फोटो पाठवला होता. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्हॉट्सॲपवर हा फोटो पाठवून तिला शोधण्याचे निर्देश दिले.

नागपूर आरपीएफच्या सतर्कतेमुळे मुलीची सुखरूप सुटका

पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्र गतिमान करत अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला असता ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली. जुम्मा इंगळे आणि डी.एस.सिसोदिया यांनी तिची चौकशी करून तिला आरपीएफ पोलीस ठाण्यात आणून पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सिंह यांच्यासमोर हजर केले. उपनिरीक्षक सिंह यांनी चाइल्ड लाईनच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत तिची चौकशी करून वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित चाइल्ड लाईन नागपूर प्रतिनिधीच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता तिने तिच्या सोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलला. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुरक्षितता लक्षात घेऊन तिला पुढील कार्यवाहीसाठी चाईल्ड लाईन नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी विद्यार्थिनीला संबंधित पोलिसांच्या मदतीने तिच्या कुटुंबीयांचा हाती सुखरूप सुपूर्द केलं. 

महत्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget