Nagpur Crime : स्कूल बसवरील महिला कंडक्टरच्या हत्येचा उलगडा, दाम्पत्य अटकेत
41 वर्षीय दीपा दास या नागपुरातील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत होत्या. उप्पलवाडी रोडवर काल (27 मार्च) प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता.
नागपूर : शालेय बसवरील महिला बस कंडक्टर दीपा दास यांच्या हत्येचा काही तासातच उलगडा झाला आहे. दीपा दास यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे. शम्मी सोनी आणि त्यांची पत्नी सुवर्णा सोनी अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. 41 वर्षीय दीपा दास या नागपुरातील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत होत्या. उप्पलवाडी रोडवर काल (27 मार्च) प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपा दास या वस्तीतील लोकांना व्याजावर पैसे उसनवारी म्हणून देत होत्या. कुशीनगर परिसरात राहणाऱ्या सोनी दाम्पत्यालाही त्याने मोठी रक्कम उसनवारीवर दिली होती. मात्र त्यांच्यात व्याजाच्या पैशांवरुन वाद सुरु होता. शनिवारी (26 मार्च) दुपारी शालेय बसवरील ड्युटी संपल्यानंतर दीपा दास कुशीनगर परिसरात सोनी दाम्पत्याच्या घरी त्याच पैशासंदर्भात गेल्या होत्या. तिथे त्यांचा सोनी दाम्पत्यासोबत वाद झाला आणि सोनी दाम्पत्याने त्यांची गळा आवळून हत्या केली. नंतर वेळ साधून सोनी दाम्पत्याने दीपा दास यांचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून उप्पलवाडी रोडवर नेऊन फेकला. पोलिसांनी या प्रकरणी शम्मी सोनी आणि त्यांची पत्नी सुवर्णा सोनी दोघांना अटक केली आहे.
Pune Crime : 13 वर्षीय मुलाचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळला!
दीपा दास यांनी शनिवारी (26 मार्च) त्यांच्या नित्यक्रमाने बसमधील सर्व मुलांना घरी सोडले. त्यानंतर कुशीनगर भागात त्या देखील बसमधून उतरल्या. तिथून त्या सोनी दाम्पत्याकडे गेल्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीय आणि पोलीस शनिवार संध्याकाळपासून त्यांचा शोध घेत होते. मात्र रविवारी (27 मार्च) संध्याकाळी कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत उप्पलवाडी रोडवर प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेला अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह दीपा दास यांचा असल्याचं समोर आलं.
संबंधित बातम्या