एक्स्प्लोर

Nagpur Crime : सरोगसीच्या नावावर दाम्पत्याची फसवणूक! अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची 7 लाखात विक्री

Nagpur Crime Update surrogacy Case : सरोगसीच्या नावावर एका दाम्पत्याची फसवणूक करत अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची 7 लाखात विक्री केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. 

Nagpur Crime Update: वर्धा जिल्ह्यातील आर्वीतील डॉ कदम यांच्या रुग्णालयातील भ्रूण सापडल्याचे प्रकरण ताजे असताना आता नागपुरात आणखी एका डॉक्टरचा प्रताप समोर आला आहे. डॉ विलास भोयर यांनी सरोगसीच्या नावावर एका दाम्पत्याची फसवणूक करत त्यांना अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची 7 लाखात विक्री केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर विलास भोयर, त्याला मदत करणाऱ्या दलालासह अनैतिक संबंधातून जन्माला येणाऱ्या मुलीच्या पित्याला अटक केली आहे. 

लग्नानंतर अनेक वर्ष बाळ न झालेले अनेक दांपत्यांना संतती हवी असते. यासाठी वेगवेगळे वैद्यकीय उपचार घेत असतात. त्यामध्ये सर्वात अखेरचा उपाय म्हणजे सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घालणे. यासाठी अनेक तज्ञ डॉक्टर्स लाखो रुपयांची फी वसूल करतात मात्र सरोगसीच्या माध्यमातून ही काही बेईमान डॉक्टर्स फसवणूक करत असल्याचं नागपुरात समोर आलंय. 

नागपूर जिल्ह्यातील गुंफा गावात डॉक्टर विलास भोयर हे प्रॅक्टिस करतात. काही महिन्यांपूर्वी अनैतिक संबंधातून गर्भधारणा झालेली एक तरुणी गर्भपातासाठी त्यांच्याकडे आली होती. त्यावेळेस डॉक्टर भोयर याने त्या तरुणीला गर्भपात न करता बाळाला जन्म दिल्यावर लाखो रुपये मिळू शकतात असे आमिष दाखवले. लाखो रुपयांची गोष्ट ऐकून तरुणी त्यासाठी तयार झाली डॉक्टर भोयर यांनी जानेवारी महिन्यात त्या तरुणीची बोगस नावाने डिलिव्हरी केली आणि जन्माला आलेली मुलगी सात लाख रुपयांमध्ये हैदराबादमधील एका निपुत्रिक दांपत्याला विकली. 

काही दिवसांपूर्वी पोलिसांना या अवैध कारभाराची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गोपनीय चौकशी करत एक पथक हैदराबादला पाठवून नवजात मुलीसह तिच्या कथित आई वडिलांना (निपुत्रिक दांपत्य) नागपुरात आणले. या दांपत्याला मूलबाळ होतं नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घालण्याची त्यांची इच्छा होती. त्याच इच्छेचा डॉ भोयर ने फायदा उचलला.  त्याने दलालाच्या माध्यमातून संपर्क साधत सरोगेसीच्या माध्यमातून तुम्हाला संतती होऊ शकते असे आश्वासन दिले. त्यासाठी डॉ भोयर याने त्या दांपत्त्यावर खोटे उपचार सुरू केले. एवढेच नाही तर सरोगसीतून जन्माला येणाऱ्या बाळासाठी निपुत्रिक पुरुषाचे शुक्राणूही डॉक्टर भोयर यांनी घेतले होते.  नंतर खोटे कागदपत्रे तयार करून नवजात मुलगी सरोगसीतून जन्माला आलेली मुलगी म्हणून त्या दाम्पत्याच्या ताब्यात दिली. 

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी डॉ विलास भोयर यासह राहुल निमजे आणि नरेश राऊत या दोघांना अटक केली आहे तर खोट्या नावाने बाळाला जन्म देणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलिसांनी डॉक्टर विलास भोयर याच्या बँक अकाउंटची ही तपासणी केली असून त्यामध्ये देशातील अनेक शहरांमधून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोप लागलेल्या डॉ भोयर याने यापूर्वीही अशा पद्धतीने गर्भपातासाठी आलेल्या अविवाहित महिलांची बाळं सरोगसीच्या नावाखाली विक्री केली आहेत? का असा संशय बळावला आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget