एक्स्प्लोर

Nagpur Crime News : गॅस एजन्सीच्या कॅशिअरवर हल्ला, साडेबारा लाखांची रोकड लुटली; नागपूरमधील घटनेने खळबळ

Nagpur Crime : चोरांनी गॅस एजन्सीच्या कॅशियरला जखमी करून 12 लाख 57 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

नागपूर:  नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेला नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.  वाडीतील डिफेन्स क्वार्टर्स परिसराजवळ चोरांनी गॅस एजन्सीच्या कॅशियरला जखमी करून 12 लाख 57 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू होण्याच्या तीन दिवस आधी घडलेल्या या घटनेने शहर पोलिसांत (Nagpur City Police) खळबळ उडाली आहे. या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. 

नागपूर-अमरावती मार्गावरील डिफेन्स क्वार्टरजवळील तोलानी चौकात हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस एजन्सी आहे. या ठिकाणी सिद्धार्थ रामचंद्र सुखदेवे (59) हे मागील 40 वर्षांपासून काम करतात. ते व्यवस्थापक आणि कॅशिअर अशी दोन्ही कामे सांभाळतात. कंपनीचे तोलानी चौकातील युको बँकेत खाते आहे. एजन्सीच्यावतीने आर्थिक व्यवहार सुखदेव स्वत: करतात. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने एजन्सीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले होते. बँकेत 12 लाख 57 हजार रुपये जमा करण्यासाठी सुखदेव सकाळी 10.30 वाजता दुचाकीवरून कार्यालयातून निघाले. गॅस एजन्सी कार्यालयापासून सुमारे 200 मीटर अंतरावर मागून आलेल्या दोन दुचाकीस्वार तरुणांनी सुखदेव यांना थांबण्याचा इशारा केला. बॅगेत पैसे असल्याने सुखदेव तरुणाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. त्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने सुखदेवच्या डोक्यात काठीने वार केला. 

या हल्ल्यानंतर सुखदेव दुचाकीसह जमिनीवर पडले. त्यानंतर तरुणांनी सुखदेव यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली. अतिशय वेगाने घडलेल्या या घटनेत जखमी सुखदेवने आरडाओरड केली. मात्र, गुन्हेगार एका गल्लीतून पळून गेले. सकाळची वेळ असल्याने घटनास्थळी फारच कमी गर्दी होती. जखमी सुखदेव यांनी एजन्सी संचालकांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुखदेवला रुग्णालयात नेण्यात आले. तोलानी चौक संकुलात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलंMumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीतThane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget