एक्स्प्लोर

Yavatmal Crime News : मोबाईल रिचार्जसाठी पैसे न दिल्याच्या रागातून नातवाने उचलले टोकाचे पाऊल; चक्क आजीचीच केली हत्या

Yavatmal Crime news : केवळ मोबईल रिचार्ज करायला पैसे न दिल्याच्या वादातून चक्क नातवाने आपल्या आजीचा गळा आवळून हत्या केली. ही खळबळजनक घटना यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील रेणूकापूर येथे घडली.

Yavatmal Crime News : आजघडीला मोबाईल ही काळाची गरज बनली असून मोबाईलमुळे जग माणसाच्या जवळ आले आहे, असे मानल्या जाते. मात्र असे असले तरी मोबाईलचा अतिजास्त वापर आणि त्याच्या आहारी जाऊन लागणारे व्यसन हे फार भयावह असू शकते. मोबाईलच्या अतिजास्त वापरातून होणाऱ्या अपघातांचे अनेक उदाहरण आपण बघतो अथवा वाचत असतो. अशाच एका मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाने केवळ मोबईल रीचार्ज करायला पैसे न दिल्याच्या वादातून रागाच्या भरात  चक्क आपल्या आजीचा गळा आवळून हत्या (Crime News) केली. ही खळबळजनक घटना यवतमाळच्या (Yavatmal News)  बाभूळगाव तालुक्यातील रेणूकापूर येथे घडली. 76 वर्षीय सिंधुबाई भरत पोवते असे मृत आजीचे नाव आहे. तर 25 वर्षीय नातू महेश विश्वास पोवते आसे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी (Yavatmal Police) आरोपीलाअटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

रिचार्जल पैसे दिले नाही म्हणून आजीचा घोटला गळा

केवळ मोबाईलच्या रीचार्जसाठी पैसे दिले नाही या किरकोळ कारणावरून चिडलेलेल्या नातवाने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणातील 25 वर्षीय आरोपी नातू महेश विश्वास पोवते याने मोबाईल रिचार्जसाठी आपल्या आजीकडे तगादा  लावला. मात्र आजीने त्यासाठी नकार दर्शविला. परिणामी आजी आणि नातवामध्ये फार वाद झाला आणि या वादातून चिडलेल्या नातवाने चक्क आपल्या आजीचा गळा आवळून खून केला.

आरोपी नातवाला ठोकल्या पोलिसांनी बेड्या 

ही गंभीर घटना यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील रेणूकापूर येथे घडली. ही घटना सिंधुबाई यांच्या मुलीच्या लक्ष्यात आल्यावर तीने पोलीस स्टेशन गाठून नातू महेश पावते विरोधात तक्रार दिली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या तक्रारीवरून यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी  घटनास्थळी भेट देऊन आरोपी महेश विश्वास पोवतेला अटक केली. या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मात्र शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून करून आरोपीला अटक केली. या प्रकरणातील पुढील तपास बाभूळगाव पोलिस ठाणे करीत आहे. 

असे होते प्रकरण 

या प्रकरणातील आरोपी असलेल्या 25 वर्षीय नातू महेश विश्वास पोवते याचे गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा रीचार्ज संपला होता. रीचार्जसाठी आपल्याकडे पैसे नाही म्हणून त्याने आपल्या आजीकडे पैश्यांची मागणी केली. मात्र आजीने त्यास नकार दिला आणि त्याने पैसे देण्यासाठी परत आजीकडे तगादा लावला. त्यानंतर आजीचे आणि महेशचा वाद झाला आणि या वादातून राग अनावर झाल्याने महेशने हे टोकाचे पाऊल घेत आजीची गळा आवळला. अल्पावधीतच आजीचा जागीच मृत्यू झाला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Crime News: अनैतिक संबंधासाठी विवाहितेवर दबाव; संतापलेल्या पती-पत्नीने डोळ्यात मिरची पूड टाकली अन् धारदार शस्त्रानं युवकाला संपवलं; यवतमाळ घटनेनं हादरलं
अनैतिक संबंधासाठी विवाहितेवर दबाव; संतापलेल्या पती-पत्नीने डोळ्यात मिरची पूड टाकली अन् धारदार शस्त्रानं युवकाला संपवलं; यवतमाळ घटनेनं हादरलं
Crime News: गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून संतापला; बॉयफ्रेंडने आपल्या मित्राला संपवलं अन् अपघाताचा बनाव रचून रेल्वे रुळांवर बांधलं..., हादरवणारी घटना
गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून संतापला; बॉयफ्रेंडने आपल्या मित्राला संपवलं अन् अपघाताचा बनाव रचून रेल्वे रुळांवर बांधलं..., हादरवणारी घटना
LPG Gas Crisis: गॅस सिलिंडरचा काळाबाजार; नाशिकमध्ये मोठी कारवाई, तब्बल 25 लाखांचा साठा जप्त, नेमकं काय घडलं?
गॅस सिलिंडरचा काळाबाजार; नाशिकमध्ये मोठी कारवाई, तब्बल 25 लाखांचा साठा जप्त, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार, नाचताना धक्का लागल्याने सटकली, तडीपार गुंडावर मित्रांचाच हल्ला; नाशिकमधील खळबळजनक घटना
हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार, नाचताना धक्का लागल्याने सटकली, तडीपार गुंडावर मित्रांचाच हल्ला; नाशिकमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget