Nagpur Blast : चामुंडी एक्सप्लोसिव्ह स्फोटातील मृतकांचा आकडा नऊवर; मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धाचीही प्राणज्योत मावळली
नागपूर जिल्ह्यातील धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतकांचा आकडा आता नऊवर पोहोचला आहे. यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धा पाटील हीची देखील प्राणज्योत मावळली आहे.
![Nagpur Blast : चामुंडी एक्सप्लोसिव्ह स्फोटातील मृतकांचा आकडा नऊवर; मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धाचीही प्राणज्योत मावळली Nagpur Blast news update Nine killed in Chamundi explosive blast relatives of the deceased and local aggressors after explosio maharashtra marathi news Nagpur Blast : चामुंडी एक्सप्लोसिव्ह स्फोटातील मृतकांचा आकडा नऊवर; मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धाचीही प्राणज्योत मावळली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/f204e00178215fffec029ac3d484f3b11718520455597892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News नागपूर : नागपूर जिल्ह्यातील धामना येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत (Chamundi Explosive Company) झालेल्या भीषण स्फोटातील (Nagpur Blast) मृतकांचा आकडा आता नऊवर पोहोचला आहे. प्रमोद चवारे नामक 24 वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान काल शनिवारच्या रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला होता. तर या स्फोटातील जखमीवर दंदे रुग्णलायत उपचार सुरू होते. त्यानंतर आता मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धा वनराज पाटील (वय 22, रा. धामना) हिचा शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्राणज्योत मावळली आहे. गुरुवारी ( दि.13 जूनच्या ) दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींवर नागपुरात उपचार सुरू होते. दरम्यान, आता या घटनेत बळींची संख्या नऊवर पोहोचला आहे. या मृत्यूच्या घटनेने मृतकांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धाचीही प्राणज्योत मावळली
नागपूर शहरातील नागपूर-अमरावती महामार्गावरील धामणा या परिसरात ही चामुंडी एक्सप्लोसिव्ह नामक स्फोटके तयार करणारी कंपनी आहे. गुरुवारी दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास या कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या कंपनीत गनपावडरपासून सेफ्टी फ्युज आणि मायक्रो कॉर्डचे उत्पादन केले जात होते. यात घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाला होता तर तीन गंभीर जखमींवर नागपुरात उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री दानसा मरसकोल्हे (वय 26, धमनिया (फुलसंच), ता. परासिया, मध्य प्रदेश) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता श्रद्धा वनराज पाटील (वय 22, रा. धामना)आणि प्रमोद चवारे नामक 24 वर्षीय तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या स्फोटात मृतकांचा आकडा आता नऊवर पोहोचला आहे.
कंपनी संचालक, व्यवस्थापकाला अटक आणि सुटका
अचानक झालेल्या या कंपनीत स्फोट झाल्याच्या कारणांचा अद्यापही शोधच घेण्यात येत आहे. येथे पाचशे किलो बारूद आणि वातींमध्ये कामगार काम करत असतानादेखील त्यांच्या सुरक्षेबाबत कंपनीकडून हव्या तशा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. पॅकेजिंग युनिट आणि परिसरात आवश्यक सुरक्षा प्रणाली तर नव्हतीच, शिवाय अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणादेखील नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीचा संचालक जय शिवशंकर खेमका आणि व्यवस्थापक सागर देशमुख यांच्याविरोधात गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला होता. यानंतर, शुक्रवारी त्यांना अटक देखील केली होती, मात्र त्या दोघांविरोधातही जामीनपात्र' कलमे लावण्यात आली असल्याने त्यांना न्यायालयातून अवघ्या काही तासात जामीनही मिळाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक रोष निर्माण झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)