गांजाची राखण मूकबधिर व्यक्ती करायचा, महिला करायच्या विक्रीचं काम! पाच जणांना बेड्या, दिंडोशी पोलिसांची कारवाई
दिंडोशी पोलिसांनी काल रात्री NDPS कायद्या अंतर्गत कारवाई करत गांजाविक्री करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.
Mumbai : अंधेरी परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अश्रफ सय्यद (वय, 30), महेश शांतीलाल बिंद (वय, 33) आणि मोबीन मेहबूब सय्यद (वय, 25) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे सर्व संशयित आरोपी संतोष नगर परिसरातील रहिवासी असून मुख्य आरोपी अशरफ सय्यद याच्याविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दिंडोशी पोलिसांनी काल (शनिवारी) रात्री NDPS कायद्या अंतर्गत कारवाई करत पाच जणांवर गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. संशयित आरोपी मुंबईच्या विविध भागांत गांजाची विक्री करत होते. या गांजाविक्रीत दोन महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या गोदामातून 23 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे दोन लाख 30 हजार इतकी आहे. यातील विशेष बाब म्हणजे हे गोदाम एक मूकबधिर व्यक्ती चालवत होता. तर महिला गांजाची खीर (औषध) बनवून बाजारात पाठवत असत.
दिंडोशीचे तपास अधिकारी एपीआय सूरज राऊत यांना गोकुळ धाम परिसरात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून माहिती घेतली असता संशयित आरोपी गोकुळधाम येथे गांजा विक्रीसाठी आली होती. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून 50 ग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी काटेकोरपणे गांजा तस्कर आणि त्यांच्या ठिकाणाची माहिती घेतली. या दरम्यान असे लक्षात आले की, अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात एक गोदाम असून तेथून गांजाची तस्करी केली जाते. पोलिसांनी त्यांच्या पथकासह अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात छापा टाकला आणि तेथून सुमारे 23 किलो गांजा जप्त केला. आश्चर्य म्हणजे या गांजाची सुरक्षा एक मूकबधिर करत होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तीन जणांना अटक केली, तर दोन्ही महिलांना समन्स बजाविण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- चीड, संतापाची दोन वर्ष! हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; अद्याप निकाल नाही, पोलिस चौकीची मागणीही अपूर्ण
- Pune: अभिनेता बनण्याचं स्वप्न, घरच्या परिस्थितीमुळं गॅरेजमध्ये करावं लागलं काम, नैराश्यातून तरूणाची आत्महत्या
- Pune : जीपीएसच्या मदतीने पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha