एक्स्प्लोर
Thackeray Reunion : ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या, 'मातोश्री'वर सहकुटुंब स्नेहभोजन, युतीवर चर्चा?
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत, एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये आगामी पालिका निवडणुकांचा आढावा घेतला जाणार असून राज्यभरातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आज राज ठाकरे यांनी सहकुटुंब 'मातोश्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही सहावी किंवा सातवी भेट असल्याचे बोलले जात असून, या भेटी कौटुंबिक असल्या तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीच्या शक्यतेमुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















