Pune: अभिनेता बनण्याचं स्वप्न, घरच्या परिस्थितीमुळं गॅरेजमध्ये करावं लागलं काम, नैराश्यातून तरूणाची आत्महत्या
Pune Suicide: अभिनेता बनून चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं एका तरूणानं आत्महत्या केलीय.
Pune Suicide: अभिनेता बनून चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं एका तरूणानं आत्महत्या केलीय. ही घटना पुण्यातील (Pune) फलटण तालुक्याच्या (Phaltan Taluka) गोखळी (Gokhali) येथे गुरुवारी (3 फेब्रुवारी) उघडकीस आलीय. नैराश्यातून संबंधित तरुणानं आत्महत्या केल्याचं नातेवाईकांकडून सांगितलं जातंय. याप्रकरणी बारामती पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.
अतुल शिंदे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. अतुल हा आपल्या कुटुंबियांसह पुण्यातील बारामती तालुक्याच्या गुणवडी येथील रहिवाशी होता. त्याला अभिनेता बनून चित्रपटात काम करायचं होतं. परंतु, घरच्या परिस्थितीमुळं त्याला गॅरेजमध्ये काम करावं लागलं. त्यामुळं तो नैराश्यात गेला. त्यानंतर त्यानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 1 फेब्रुवारीला अतुल बेपत्ता असल्याची त्यांच्या नातेवाईकांनी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर गुरुवारी फलटण तालुक्यातील गोखळी गावातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी बारामती पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली.
सातारा: इंग्रजीच्या भीतीनं विद्यार्थीनीची आत्महत्या
सातारा जिल्ह्यात एका विद्यार्थीनींनी आत्महत्या केली होती. सेमी इंग्लिश नको म्हणून साताऱ्यातील या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ही पालकवर्ग, शिक्षक आणि एकूणच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांची बळजबरी करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे. सेमी इंग्लिश नको असल्यामुळे जीवन संपवत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये तिने म्हटलंय.
हे देखील वाचा-
- Dr. Suvarna vaze Murder : पेटलेल्या कारमधील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं, नवऱ्यानेच हत्या केल्याचं उघड
- तब्बल 17 लाखांच्या सोयाबीनची चोरी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे 24 तासांत चोरीचा माल परत
- Pune: पुण्यातील धक्कादायक घटना! खेळण्याचे आमिष दाखवून दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, एकास अटक
- सिंधुदुर्गातील बांद्यात 89 जिवंत गावठी बॉम्ब जप्त, बंदुकीच्या नळ्यांसह रिकामी काडतुसेही सापडली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha