एक्स्प्लोर

Pune : जीपीएसच्या मदतीने पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडले

Extramarital Affair :  पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडण्यासाठी पत्नीने चक्क जीपीएसचा ट्रॅकरचा वापर केला.

Extramarital Affair :  पतीचे विवाहबाह्य संबंध शोधून काढण्यासाठी काहीवेळेस खासगी गुप्तहेर अथवा इतर मार्गाचा अवलंब केला जातो. मात्र, एका पत्नीने हायटेक पद्धतीचा वापर करत पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडले. पत्नीने यासाठी जीपीएस ट्रॅकरची मदत घेतली. पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरिफ मांजरा नामक एका उद्योजकाचे विवाहबाह्य संबंध होते. तो पत्नीला खोटं बोलून अनेकदा त्याच्या प्रेयसीला भेटायचा. याची कुणकुण पत्नीला लागली. पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडण्यासाठी पत्नीनं शक्कल लढवली. व्यावसायिक बैठकी, कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात जात असल्याचे आरीफ पत्नीला भासवायचा. प्रत्यक्षात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असल्याचा पत्नीला संशय येत होता. आरीफच्या वागण्यातील बदल ही तिला खटकू लागला. त्यामुळे पतीचे 'कार'नामे समोर आणायचा निर्धार पत्नीने केला.  यासाठी पत्नीने जीपीएसचा आधार घ्यायचं ठरवलं. कोणाला कानोकान खबर न लागू देता पत्नीने जीपीएसचे किट पतीच्या फॉर्च्युनर 'कार'ला बसवले. मूळचा गुजरातचा आरिफ पत्नीला फसवून पुण्याला आला होता. जीपीएस ट्रॅकरनुसार कारचे लोकेशन अनेकदा पुण्यातच आढळू लागले. आरीफची कार 21 ऑक्टोबर 2020 ला देखील पुण्यातच दिसून आली.

बावधन येथील 'व्हिव्हा ईन हॉटेल'चे लोकेशन आढळून आले. पत्नीने तातडीनं गुगलवर सर्च करून हॉटेलचा नंबर मिळविला आणि चौकशी केली. आरिफ मांजरा नावाची व्यक्ती हॉटेलमध्ये आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्याने 'हो' असं उत्तर दिलं. मग त्यांच्यासोबत कोण आहे? असा पुढील प्रश्न केला असता हॉटेलमधून महिलेचं नाव सांगण्यात आलं. ते नाव स्वतः पत्नीचं होतं. पण पत्नीने ते नाव तर माझं आहे असं सांगितलं. मग पत्नीच्या लक्षात आलं की तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. तरी तिने प्रत्यक्षात हॉटेलमध्ये येऊन पहायचं ठरवलं. त्यानंतर पत्नी नोव्हेंबर 2020मध्ये गुजरात वरून पुण्यात त्या हॉटेलमध्ये आली. तिथं अधिकची माहिती मिळविण्याचे तिने प्रयत्न केले असता पतीने त्या महिलेचे म्हणून तिच्या आधारकार्डची झेरॉक्स दिली होती. मग 21 ऑक्टोबर 2020चे सीसीटीव्ही तपासले असता त्या दिवशी हॉटेलमध्ये आलेली महिला दिसून आली.  ही महिला चंदीगड येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा 1 फेब्रुवारी 2022 रोजी दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस याचा तपास करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action On Siya Goyal Father Shop Pune Market: सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय काय म्हणाले?
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय म्हणाले?
Jejuri Warkari Accident Deaths : जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; CBIच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
'नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Embed widget