मुंबईत 15 वर्षांच्या पोरीचा 19 वर्षांच्या पोरावर जीव जडला, घरच्यांचा नकार; विक्रोळी स्थानकात एक्स्प्रेस गाडीसमोर झोकून देत आयुष्य संपवलं
Mumbai Crime News : मुंबईतील विक्रोळीमधून (Vikhroli) एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. यात एका अल्पवयीन प्रेमियुगलाने टोकाचे पाऊल घेत आपले जीवन संपवले आहे.
Mumbai Crime News : मुंबईतील विक्रोळीमधून (Vikhroli) एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. यात एका अल्पवयीन प्रेमियुगलाने टोकाचे पाऊल घेत आपले जीवन संपवले आहे. यातील मुलीचे वय अवघे 15 असून मुलाचे वय 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ही पुढे आली आहे.
धावत्या एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 26 जानेवारीच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. यातील पंधरा वर्षीय मुलगी ही परप्रांतीय असून मुलगा हा महाराष्ट्रातील रहिवाशी आहे. या दोघात जवळीक असून प्रेम प्रकरणाला प्रांतीय अथवा जातीय अँगल असून लग्नाला विरोध केल्याने ही घटना घडलीय का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. हे दोघेही भांडुपच्या हनुमान नगर परिसरातील रहिवासी आहे. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ही मुलगी आपल्या आजीसोबत बाहेर गेली होती. मात्र मधातच ही मुलगी आजीपासून बाजूला झाली. त्यानंतर ती गायब असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांतर्फे शोधाशोध केली असता रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याने हे प्रकरण आज उजेडात आले आहे. परिणामी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; माहेरच्याकडून आरोप, सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल
नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून मयत महिलेच्या आईने मुलीची हत्या झाल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल केलाय. शहरातील मालेगांव रोडवरच्या तुळशीराम नगर भागातील ही घटना आहे. प्रियंका अभिजित अन्नपुरे असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. माहेरावरून सोने आण अशी मागणी करत सासरची मंडळी तिचा सातत्याने छळ करत होती. त्यातच काल तिचा संशयास्पद मृत्यू झाला असून मयत विवाहितेच्या भावाने सासरच्या मंडळींनीच तिची हत्या केली असा आरोप केलाय.या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये सासू सासरे नणंद नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आणखी वाचा