एक्स्प्लोर

Pune News : लेखक राजन खान यांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल, चिठ्ठीतून आले कारण समोर!

Pune Crime : मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्याा मुलाने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपववले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पुणे मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखक राजन खान (Rajan Khan) यांच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सोमटने फाटा (Pune Somatane Phata) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. डेबू राजन खान (Debu Rajan Khan) असे या युवकाचे नाव आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाइड नोटदेखील लिहीली आहे. 

लेखक राजन खान यांच्या आयटी अभियंता मुलाने (IT Engineer)आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. पुण्यातील सोमटने फाटा येथे ही घटना सोमवारी सायंकाळी समोर आली. डेबू राजन खानने गळफास घेत आयुष्य संपवलं. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, तसा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू आयटी अभियंता होता अन तो सोमटने फाटा इथं एकटाच राहायचा. मात्र सोमवारी सकाळपासून त्याने घराचे दार उघडलेच नाही. हे पाहून दुपारी घर मालकिणीने डेबूच्या भावाशी संपर्क साधला. भावाने ही डेबूशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तो न झाल्याने पुण्यात राहणाऱ्या भावाने सोमटने फाटा गाठलं अन घराचे दार ठोठावले. पण डेबूने काहीच प्रतिसाद दिला नाही, शेवटी तळेगाव पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. 

पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता, बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचं समोर आलं. आत्महत्येपूर्वी डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली आहे. त्यात आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचं अन त्यातून फटका बसल्याचा उल्लेख आहे. तसेच ज्यांच्याशी पैश्यांची देवाण-घेवाण केली, त्यांची नावं ही नमूद आहेत. त्याच आधारावर तळेगाव पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे डेबूचं शवविच्छेदन करून मृतदेह लेखक राजन खान यांना देण्यात आला आहे.

लोणावळा लायन्स पॉइंटजवळ टोकाचे पाऊल घेण्यासाठी उभा, लोकांकडून विनवणी...अंधार पडला अन्...

पर्यटन स्थळी लोकांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचे मन वळवण्याचे प्रयत्न स्थानिकांकडून आणि बचाव पथकाकडून करण्यात आले. मात्र, सायंकाळी पडलेल्या धुक्यात आणि नंतर रात्रीच्या अंधारात हरवलेल्या व्यक्तीचा थेट मृतदेहच हाती लागल्याची घटना शुक्रवारी लोणावळ्यात समोर आली. 

लोणावळा (Lonavala) येथील लायन्स पॉइंट (Lions Point) येथे एक व्यक्ती डोंगराच्या कडेला उभा राहिला होता. त्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या माणसाच्या तोंडून सतत मी आत्महत्या करणार आत्महत्या करणार बोलत होता. मात्र त्यावेळी जवळ असलेल्या नागरिकांनी त्याला असे करू नको म्हणत होते. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले.  त्यानंतर रिस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झाली.  त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र  सायंकाळच्या पाच सहाच्या दरम्यान या भागात धुके वाढले, अंधार पडू लागला. त्यानंतर त्या ठिकाणाहून  तो व्यक्ती दिसेनासा झाला. मात्र नंतर शोधकार्य सुरू केले मात्र तो सापडला नाही. 

बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे 25 सप्टेंबरपासून त्याचे शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र त्याचा मृतदेह आता राजगड हद्दीत सापडला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संतोष शिळावणे वय अंदाजे 42 वर्ष असून  तो लोणावळा परिसरातील  रामनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप समोर आलेले नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget