एक्स्प्लोर

धक्कादायक! बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने पेटवून घेतले, प्रकृती चिंताजनक; बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील घटना

Beed Crime News : पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

Beed Crime News : रिक्षात विसरलेली पर्स वापस देण्याच्या बाहाण्याने एका महिलेवर रिक्षा चालकासह इतर सात जणांनी बलात्कार केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यातील मुख्य आरोपीनं मंगळवारी रात्री 11.30 वाजता बीडच्या (Beed) पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले आहेत. पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. संदीप पिंपळे असं आत्महत्या (Suicide) करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात माजलगाव पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी संदीप पिंपळे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमरास पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असं म्हणत त्यानं अंगावर डिझेल ओतून घेतले. अंगावर डीझेल ओतल्यावर त्यानं स्वतःल पेटवून घेतलं. त्यामुळे नियंत्रण कक्षातील पोलिसांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पोलिसांनी संदीपला तत्काळ बाजूला असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. परंतु जास्त प्रमाणात भाजल्यानं त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण? 

गेल्या आठवड्यात माजलगाव पोलिसांत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 2014 मध्ये ती प्रवास करत असताना ती आपली पर्स संदीप पिंपळेच्या रिक्षात विसरली होती. दरम्यान पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळेने महिलेवर अत्याचार केला होता. तर अत्याचार करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. पुढे हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोलेसोबत देखील पीडित महिलेला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर गोरख इंगोलेनेही महिलेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सतत अत्याचार केला. 2015 साली गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे 2020 मध्ये गोरख इंगोले याने महिलेला एका घाटात नेऊन आपल्या इतर चार साथीदारांसोबत आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर  देखील नेहमी वारंवारचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने माजलगाव शहर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला होता. ज्यात संदीप पिंपळे मुख्य आरोपी होते. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Beed Crime News : धक्कादायक! सामूहिक बलात्काराने बीड हादरलं, आळीपाळीने तब्बल 6 तास अत्याचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हानMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Embed widget