एक्स्प्लोर

Beed News : "लेकरांकडे लक्ष दे, मी धरणात उडी मारतेय"; भावाला फोन करून बहिणीची आत्महत्या

Beed Suicide News : मात्र या महिलेने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आलेले नाही.

Beed Suicide News : आपल्या भावाला फोन करून धरणात उडी मारून एका महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed) समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तर 'मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असा कॉल महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला केला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र या महिलेने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. तर जिजाबाई भारत जोगदंड (वय 49 वर्षे, वासनवाडी फाटा, पांगरी रोड, बीड) असे मयत महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पाली येथील धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर जिजाबाई यांनी धरणात उडी मारून जीवन संपविले. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना परिसरातील लोकांना दिसला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती तत्काळ बीड ग्रामीण पोलिसांना दिली.

एका महिलेने पालीच्या धरणात उडी घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धरणाकडे धाव घेतली. तोपर्यंत सर्व नातेवाइक पालीच्या धरणावर पोहचले होते. स्थानिक आणि नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. तर जिजाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

नातेवाईकांची धरणाकडे धाव...

जिजाबाई जोगदंड या घरात कोणालाही कोणतेही कल्पना न देता घरातून बाहेर पडल्या. काही वेळात त्यांनी पाली धरण गाठले. धरणावर पोहचताच त्यांनी आपल्या मोबाईलवरून भावाला फोन केला. तसेच  मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. त्यामुळे त्यांच्या भावाने तत्काळ याची माहिती जिजाबाई यांच्या घरातील सदस्यांना आणि इतर नातेवाईकांना दिली. त्यामुळे जिजाबाई यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील तत्काळ पाली धरण गाठले. मात्र तोपर्यंत जिजाबाई यांनी धरणात उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

धक्कादायक! Whatsapp स्टेटसला पतीचा फोटो ठेवून नर्सने घेतला गळफास; बीड जिल्ह्यातील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Air Way : दु्ष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणामRatnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Embed widget