धक्कादायक! Whatsapp स्टेटसला पतीचा फोटो ठेवून नर्सने घेतला गळफास; बीड जिल्ह्यातील घटना
Beed Suicide : शिवकन्या शिरूरच्या आरोग्य केंद्रात कंत्राटी नर्स म्हणून काम करत आहेत.
Beed Suicide News: बीड जिल्ह्यातील (Beed District) शिरुर कासार येथे एक धक्कादायक घटना समोर आला असून, Whatsapp स्टेटसला पतीचा फोटो ठेवून कंत्राटी नर्सने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. शिरुर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही महिला कंत्राटी स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवकन्या गोरख देवडे (वय 33, रा. पिंपळनेर ह. मु. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या शिवकन्या गोरख देवडे यांनी आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले, तरी आत्महत्येपूर्वी शिवकन्या यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला पतीचा फोटो ठेवला आहे. सोबत आणखी तिघे असून त्यात एक पुरुष आणि दोन महिलांचाही समावेश आहे. ते कोण आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंद दरवाजा तोडला...
शिवकन्या शिरूरच्या आरोग्य केंद्रात कंत्राटी नर्स म्हणून काम करत आहेत. रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरीच एका पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. खिडकी उघडी असल्याने हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर घनश्याम मारुती मैंदड यांनी फोन करून नातेवाइकांना याबाबत कळवले आहे. तसेच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंद दरवाजा तोडून लटकलेला मृतदेह खाली घेतला.
तर शिवकन्या यांचे पती गोरख देवडे हे ट्रकचालक असल्याने ते बाहेर होते. तर 11 वर्षांचा मुलगा नातेवाइकांकडे गेला होता. त्यामुळे शिवकन्या घरात एकट्याच असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार विकास उजगरे हे करत आहेत. या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
शवविच्छेन करताना डॉक्टर, कर्मचारीही भावुक
शिरुर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या शिवकन्या गोरख देवडे यांनी आत्महत्या केली. तर शिरुर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या 12 वर्षापासून काम करत होत्या. त्यामुळे ज्या आरोग्य केंद्रात एवढी वर्षे काम केले त्याच आरोग्य केंद्रात शिवकन्या यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. तर सहकारी कर्मचाऱ्याचे शवविच्छेन करताना डॉक्टर, कर्मचारीही भावुक झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन ठोकली धूम; बीड जिल्ह्यातील घटना