Kolhapur Accident News: मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर थरार; अनेक महिलांसह भाविकांना धडक, जमावाकडून कपडे फाटेपर्यंत धुलाई
Kolhapur Accident News: कोल्हापूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर थरार अनुभवायला मिळाला आहे.

Kolhapur Accident News: कोल्हापूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर थरार अनुभवायला मिळाला आहे. महाद्वार रोडच्या वन वेतून आत येत या मद्यधुंद कारचालकाने अनेक महिलांसह, भाविकांना धडक (Kolhapur Accident) दिली आहे. तर काही दुचाकींना सुद्धा जोरदार धडक दिली आहे. कायम वर्दळीच्या ठिकाण असलेल्या महाद्वार रोडवर हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
मद्यधुंद कारचालकाची जमावाकडून कपडे फाटेपर्यंत धुलाई
दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करून या कार चालकाला रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अशातच यावेळी संतप्त जमावाने मद्यधुंद कारचालका कपडे फाटेपर्यंत धुलाई केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जुना राजवाडा पोलिसांनी तपास केला असता मद्यधुंद कारचालक हा सांगलीचा असून प्रसाद दत्तात्रय सुतार असे त्याचे नाव आहे. यावेळी प्रसाद सुतार याच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाईही केली जात आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवीन स्पीड गव्हर्नसाठी परिवहन विभागाचा हट्ट का? स्कुल व्हॅन संघटनेचा संतप्त सवाल
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने स्कूल व्हॅनला वेग मर्यादा ही 40 किलो मीटर प्रति तास आखून दिली आहे. हि वेग मर्यादा नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक स्कुल व्हॅन मध्ये स्पीड गव्हर्नर लावणे बंधनकारक असते. ते स्कुल व्हॅन चालकांनी लावून पण घेतले आहे. मात्र स्कूल व्हॅनच्या स्पीड गव्हर्नरला घेऊन परिवहन विभागाने 16 डिजिटची नवीन नियमावली आणली आहे. जुन्या 4 डिजिटच्या स्पीड गव्हर्नर असतांना नवीन स्पीड गव्हर्नसाठी परिवहन विभागाचा हट्ट का ? असा प्रश्न स्कुल व्हॅन संघटने केला आहे. अवैध स्कुल व्हॅन ला परिवहन विभाग हात लावत नाही मात्र जे नियमानुसार अधिकृत पणे स्कुल व्हॅन चालवतात त्यांच्यासाठी दर वर्षी कोणत्या ना कोणत्या नवीन नियम आणून परिवहन विभागाने स्कुल व्हॅन चालकांकडून पैसे उकळण्याचे साधन केल्याचा गंभीर स्कुल व्हॅन चालक संघटनेने केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















