एसी दुरुस्तीच्या नावाखाली करायचे रेकी, नंतर करायचे घरफोडी, कल्याण पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai : या गस्ती दरम्यान पोलिसांनी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. तपासा दरम्यान हे दोघे सराईत चोरटे असल्याचे उघड झाले आहे. अजय ठठेरा आणि भावेश भगतानी अशी दोघांची नावे आहेत.
मुंबई : वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी कल्याण पूर्व परिसरात गस्ती वाढवल्या आहेत. या गस्ती दरम्यान पोलिसांनी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. तपासा दरम्यान हे दोघे सराईत चोरटे असल्याचे उघड झाले आहे. अजय ठठेरा आणि भावेश भगतानी अशी दोघांची नावे आहेत. या दोघांकडून आतापर्यंत पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सोन्याच्या दागिण्यांसह पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अजय हा कल्याण पूर्व परिसरात चोरी करण्याआधी एसी रीपेयरींगचा बहाणा करत पाहणी करायचा. त्यानंतर संधी साधून त्याचा साथीदार भावेशच्या मदतीने याच परिसरात घरफोडी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण पूर्व परिसरात घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने या गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद करण्यासाठी कोलशेवाडी पोलिसांनी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, डीसिपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पगारे यांच पथक नेमले होते. या पथकाची परिसरात गस्त सुरू असताना दुचाकीवर आलेल्या दोन तरुणावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असतां त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला.
या दोघांची कसून चौकशी केली असता दोघे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. या दोघांनी कल्याण पूर्वेत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून कल्याण पूर्व परिसररतील पाच घरपोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या दोघांनी आणखी किती ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव परिसरात राहणारा अजय हा एसी रिपेरिंगचे काम करत असून एसी रिपेरिंगसाठी एखाद्या इमारतीत गेल्यानंतर इमारतीची रेकी करत असे. इमारतीत कोणती घरे बंद आहेत हे हेरून तो भावेशच्या मदतीने या इमारतीत घरपोडी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या दोघांकडून अजून माहिती घेतली जात असून पोलीय या प्रकरणी कसून तपास करत आहेत, असी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या