Nagpur Crime : मर्चंट नेव्हीची तयारी करणाऱ्या युवकाची आत्महत्या, सततच्या अपयशाने होता निराश
पोलिसांच्या तपासात करणच्या खिशात चिट्ठी आढळून आली. ‘सॉरी आई-बाबा मी अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.' असा उल्लेख करीत माझ्यामुळे सातत्याने खाली बघावे लागते, आता तसे होणार नसल्याचेही त्याने लिहीले.
नागपूरः मर्चंट नेव्हीत प्रवेशाची तयारी करणाऱ्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. धरमपेठेतील ऋतसृष्टी संकुलातील पाचव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना उघडकीस आली. करण शांतीलाल जयस्वाल (28) असे मृताचे नाव आहे. तो मूळचा यवतमाळच्या माळीपुरा, नवप्रशांत चौकातील रहिवासी आहे. करणने एरोनॉटीकल इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मुलाने मर्चंट नेव्हीमध्ये जावे अशी आई-वडिलांसह कुटुंबियांची इच्छा होती. यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून मर्चंट नेव्हीमध्ये निवडीसाठी तयारी करीत होता. त्यासाठी तो नागपुरातील धरमपेठ भागात असलेल्या ऋतसृष्टी संकुलातील पाचव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये अन्य दोन मित्रांसोबत वास्तव्यास होता. त्याची बहिणसुद्धा नागपुरातच राहते.
सततच्या अपयशाने होता निराश
मर्चंट नेव्हीची तयारी करीत असताना त्याच्या पदरात सातत्याने अपयश पडत होते. यामुळे तो कमालीचा निराश झाला होता. त्यातही यावर्षी त्याचा मर्चंट नेव्हीच्या प्रवेशाची अंतिम संधी होती. त्यामुळे तो सतत तणावात राहायचा. तणावातून त्याने टोकाचे पाउल उचलले असण्याची शक्यता आहे. मर्चंट नेव्हीची तयारी करीत असतानाचा त्याला अलिकडेच एका आयटी कंपनीमध्ये नोकरीही मिळाली होती. या आनंदापेक्षाही तयारीत यश मिळत नसल्याने तो सतत विचारमग्न असायचा.
RSS शस्त्रसाठा माहिती ; जिल्हा व सत्र न्यायालयाची नागपूर पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला
नारळाच्या दोरीने लावला गळफास
करणने राहत्या फ्लॅटमध्ये नारळाच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी रुमपार्टनर जयेश फ्लॅटवर आला. आतून दार बंद होते. त्याने बाहेरून करणला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. घाबरून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. कसेबसे दार उघडण्यात आले. त्यावेळी करणने गळफास घेतल्याचे दिसले. सीताबर्डी पोलिसांना घटनेची सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. पोलिसांनी प्राथमिक तपासावरुन अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
Special Trains : 32 अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेनचे नियोजन, 13 सप्टेंबरपासून धावणार गणपती फेस्टिव्हल ट्रेन
'आई-बाबा सॉरी'
पोलिसांनी तपासाणी केली असता करणच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली. त्यात त्याने आई-वडीलांची माफी मागितली. ‘सॉरी आई-बाबा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.' असा उल्लेख करीत माझ्यामुळे तुम्हाला सातत्याने खाली बघावे लागते, आता तसे होणार नसल्याचेही त्याने नमूद केले आहे.