राजस्थानच्या गेहलोत सरकारमधील मंत्र्याच्या मुलावर महिला पत्रकाराचा बलात्काराचा आरोप, दिल्लीत गुन्हा दाखल
Rajasthan : महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर रोहित जोशी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असला तरी काही महिन्यांपूर्वी या महिला पत्रकाराशी त्याच्या कथित लग्नाची चर्चा रंगली होती.

Rajasthan : राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारमधील (CM Ashok Gehlot Cabinet) जलविभागाचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्यावर एका महिला पत्रकाराने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या महिला पत्रकाराने रोहितविरुद्ध दिल्लीतील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यावर दिल्ली पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवून राजस्थान पोलिसांकडे पाठवला आहे.
महेश जोशी यांची गणना राजस्थानच्या बड्या मंत्र्यांमध्ये केली जाते. शिवाय त्यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे मानले जाते. जोशी यांना काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. महेश जोशी यांचा मुलगा रोहित काँग्रेसमध्ये सक्रिय असून तो पीसीसी सदस्यही आहे.
महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर रोहितवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असला तरी काही महिन्यांपूर्वी या महिला पत्रकाराशी त्याच्या कथित लग्नाची चर्चा रंगली होती. रोहित आधीच विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. रोहितने या महिला पत्रकाराशी केलेल्या लग्नाच्या चर्चेतून दुसऱ्या लग्नासाठी धर्मही बदलल्याचे समोर आले होते. मात्र, त्यानंतर या गोष्टी केवळ चर्चाच राहिल्या. कारण त्यानंतर कोणताही वाद झाला नाही. मात्र, आता अचानक या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे.
पीडित महिला पत्रकाराने रोहितवर सवाई माधोपूर येथे नेऊन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय या महिलेने रोहितवर तिचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील केला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फेसबुकच्या माध्यमातून ती रोहित जोशीच्या संपर्कात आली. रोहितचे तिच्यासोबत शारीरिक संबंध होते. यातून ती गरोदर राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात करून घेतला.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नांदेड जिल्ह्यातील घटनेने खळबळ
Beed : माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार; पोलिसांना आव्हान देत केला खून
Nashik : नाशिकमध्ये जातपंचायत आणि ग्रामपंचायतीचा अजब फतवा! आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
