![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
हॉटेलमध्ये जेवणाऱ्या तरुणावर वार, हादरवणारे कृत्य CCTV मध्ये कैद, जळगावातील थरारक घटना
Jalgaon Crime : जुन्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये जेवत असलेल्या तरुणावर वार केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामुळे जळगाव पुन्हा एकदा हादरले आहे.
![हॉटेलमध्ये जेवणाऱ्या तरुणावर वार, हादरवणारे कृत्य CCTV मध्ये कैद, जळगावातील थरारक घटना Jalgaon Crime Young Man died after being beaten up by seven people incident caught on CCTV camera four Arrested Maharashtra Marathi News हॉटेलमध्ये जेवणाऱ्या तरुणावर वार, हादरवणारे कृत्य CCTV मध्ये कैद, जळगावातील थरारक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/872b0913122b6037e42fbbb1dd9281431716446596194923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalgaon Crime News : जुन्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये जेवत असलेल्या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना जळगाव शहरात (Jalgaon News) घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेतील चार जणांना पोलिसांनी (Police) अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिका माता मंदिर (kalika Mata Mandir) परिसरात असलेल्या हॉटेल भानू येथे रात्रीच्या वेळी किशोर सोनवणे (Kishor Sonawane) हा तरुण काही मित्रांच्या समवेत जेवण करत होता. यावेळी हातात काठ्या घेऊन सात ते आठ तरुण हॉटेलमध्ये शिरले.
जुन्या वादातून तरुणाची हत्या, चार जण गजाआड
त्यानंतर टोळक्याने किशोर सोनवणेवर हल्ला केला. यामुळे किशोर सोनवणे जागीच मृत्यू झाला. मृत्यू होऊनही टोळक्याने त्याला मारहाण सुरूच ठेवल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. या घटनेतील आरोपी विरोधात शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)